शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महानगरांमध्ये कचरा वर्गीकरण हीच मोठी समस्या: सुलक्षणा महाजन

By संजय पाठक | Updated: March 9, 2019 23:26 IST

महानगरपालिका मोठ्या असल्या तरी स्वच्छतेचे निकष पाळत नाहीत, कचरा वर्गीकरण एकतर होत नाही, दुसरी बाब म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळेच राज्यातील महानगरांची पिछेहाट झल्याचे मत नगररचना रचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकच-याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची गरजनागरीकांची मानसिकता बदलण्याची गरज

नाशिक - केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत नुकताच निकाल घोषीत झाला आणि त्यात राज्यातील अनेक मोठ्या सक्षम महापालिकांची घसरण झाली. नाशिक महापालिकेचा क्रमांक ६३ वरून ६७ वर घसरला तर राज्यात विसावा क्रमांक आला. त्यामुळे नाशिकसह राज्यातील विविध महापालिकांच्या स्वच्छतेविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. महानगरपालिका मोठ्या असल्या तरी स्वच्छतेचे निकष पाळत नाहीत, कचरा वर्गीकरण एकतर होत नाही, दुसरी बाब म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळेच राज्यातील महानगरांची पिछेहाट झल्याचे मत नगररचना रचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले. महाजन यांचा नगररचनेबाबत प्रचंड अभ्यास असून शासनाच्या अनेकविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. मुख्य म्हणजे रेराच्या रचनेसाठी देखील त्यांनी योगदान दिले आहे.प्रश्न : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात महाराष्टÑातील अनेक महापालिका मागे पडल्या त्याचे काय कारण आहे असे वाटते?महाजन : राज्यातील सर्व महापालिकेची गुणांचे तक्ते माझ्याकडे नाहीत. परंतु अनेक त्रुटींमुळे महापालिका मागे पडत आहेत हे मात्र नक्की. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही त्याच प्रमाणे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प अनेकांनी योग्य पध्दतीने राबविलेले नाहीत. शास्त्रोक्त पध्दतीने कचºयाची विल्हेवाट हा खूप मोठा भाग आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच शहरे मागे पडत आहेत. शासनाच्या सूचनेप्रमाणे बहुतांशी महापालिकांनी घन कचरा व्यवस्थापनासाठी युजर चार्जेस आकारलेले नाहीत. त्या सर्व पार्श्वभूमीवर विचार करण्याची वेळ आली आहे.प्रश्न : स्वच्छतेबाबत महाराष्टÑातील महापालिका या अन्य शहरांशी स्पर्धा वाढली म्हणून मागे पडत आहेत असे वाटते का?महाजन : केंद्र शासनाने शहराची संख्या वाढविली असली तरी त्यांचे नगरपालिकांची स्वतंत्र कॅटेगिरी आहे. यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा संबंधच येत नाही. परंतु, दोन्हींसाठी निकष सारखेच आहेत त्यात बदल करावा असे वाटत नाही. परंतु एकंदरच स्वच्छतेविषयी अपुरे प्रयत्न होतात. त्यात सुधारणा करणे गरजेचे आहेत. मुळात नगरपालिकांचे क्षेत्र छोटे आहे म्हणून त्यात चांगली स्वच्छता करता येते आणि मोठी शहरे असल्यास स्वच्छता करता येत नाही असे म्हणणे मला योग्य वाटत नाही. जगात अनेक मोठी शहरे आहेत आणि त्यात चांगली स्वच्छता असते. त्यामुळे स्वच्छतेला महत्व आहे असे मला वाटते.प्रश्न: राज्यातील महापालिकांनी भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी काय केले पाहिजे असे वाटते?महाजन: महापालिकांनी स्वच्छ शहर स्पर्धेसाठी चांगले काम केले पाहिजे. विशेषत: ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण नागरीकांनी केले पाहिजे आणि त्याच बरोबर महापालिकेने देखील त्याच धर्तीवर पुढे नेले पाहिजे. कचरा वर्गीकरण न केल्यास त्याला हजार रूपये दंड असून त्याचा वापर महापालिकांनी करायला हवा. त्याच बरोबर रस्त्यात कचरा टाकण्याचे प्रकार नागरीकांनी टाळले पाहिजे. नागरीकांची मानसिकता बदलणे हे सर्वात मोठे आव्हान आहे असे मला वाटते.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार