शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवासाठी गरबा, दांडियाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:20 IST

आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत.

नाशिक : आठ दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या प्र्रात्यक्षिकांना तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. घरोघरी होणारी घटस्थापना, तसेच सार्वजनिक मंडळांतर्फेघेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असल्याचे आढळून आले.नवरात्रोत्सवात सार्वजनिक मंडळे तसेच अनेक संस्था गरबा स्पर्धेचे आयोजन करत असतात. यासाठी शहरातील विविध भागांत गरबा प्रात्यक्षिकांचे शिबिर भरण्यात आले आहे. या काळात तरुण-तरुणींचा उत्साह मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. यासाठी तरुणाईकडून बाजारात गरबा खेळण्यासाठी लागणाºया साहित्यांची खरेदीसाठी बाजारात आतापासूनच गर्दी बघायला मिळत आहे. बाजारात यासाठी विविध प्रकारच्या दांडिया, गरबा खेळण्यासाठी लागणारे कपडे, टोप, तरुणींसाठी लागणारे अलंकार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्याची चिन्हे आहे.बाजारात गरब्याचे साहित्य दाखलनवरात्रोत्सवात तरुण-तरु णींचा उत्साह शिगेला पोहोचतो. तसेच उत्सवात अनेक मंडळे, संस्था गरबा, दांडियाच्या स्पर्धा आयोजित करत असतात. त्यासाठी तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतो. गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणारे साहित्य, कपडे खरेदीला या दिवसांत मागणी वाढत असल्यामुळे बाजारात आताच साहित्य उपलब्ध झाले आहे. यात निरनिराळ्या प्रकारच्या दांडिया, गुजराथी-मारवाडी प्रकारचे कपडे बाजारात बघायला मिळत आहे. यामध्ये दांडियाची जोडी ४० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. तसेच गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणारे कपडे बाजारात भाड्याने मिळत असून, एक दिवासाला १५० रुपयांपासून पुढे भाडे आकारले जात आहे.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गरबा प्रशिक्षणाची कार्यशाळा सुरू आहे. यात तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. गरबामध्ये हिंच, दोडियो, पोपटीयो, टिटाडा दोन ताली, छगडी, रास गरबा या प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते.- महेंद्र ठाकूर, गरबा प्रशिक्षक

टॅग्स :Navratriनवरात्रीNashikनाशिक