शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर रवी पुजारी नाशिक न्यायालयात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:11 IST

दहा वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डी रोडवरील एका बिल्डरच्या बांधकाम साइटवर गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात नाशिक व मुंबई पोलिसांना हवा असलेला आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारी यास शुक्रवारी (दि. २३) कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आला.

ठळक मुद्देदहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात अटक : सात दिवस पोलीस कोठडी, मुंबईला रवाना

नाशिक : दहा वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डी रोडवरील एका बिल्डरच्या बांधकाम साइटवर गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात नाशिक व मुंबई पोलिसांना हवा असलेला आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारी यास शुक्रवारी (दि. २३) कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आला. बिल्डरकडे सुमारे दहा कोटीची खंडणी मागण्याची धमकी पुजारी याने दिल्याने त्याच्या आवाजाचे नमुने तपासण्यासाठी न्यायालयाने पुजारी यास सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रवी पुजारी याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी असलेले संबंध व टोळ्यांशी असलेले वैमनस्य पाहता त्याच्या दौऱ्याबाबत पुरेपूर गोपनीयता मुंबई व नाशिक पोलिसांनी पाळत, न्यायालयात हजर केले.  वडाळा-पाथर्डी रोडवर एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू असताना गँगस्टर रवी पुजारी याने सुमारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास गेम करू, अशी धमकी दिली होती. त्याचाच भाग म्हणून २५ नोव्हेंबर २०११ रोजी बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात बांधकाम व्यावसायिकांचा कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन नंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे याचा तपास देण्यात येऊन पोलिसांनी चौघा जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारी, योगेश कल्ली ऊर्फ सुरेश बंगेरी व भुपेंद्र राजपत सिंह हे तिघे फरार होेते. मात्र, ज्या चार आरोपींना अटक करण्यात आली.  त्या चौघांपैकी तिघांना २०१९ मध्ये जन्मठेप तर एकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. गँगस्टर रवी पुजारीला काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांनी अटक केली असून, नाशिकच्या गुन्ह्यात रवी पुजारीला शुक्रवारी (दि.२३) विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश जी. पी. देशमुख यांच्यासमोर युक्तिवाद होऊन सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली व बांधकाम व्यावसायिकाला पुजारी याने दिलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग न्यायालयासमोर सादर करून त्याच्या  आवाजाचे नमुने घेण्यासाठी तसेच उर्वरित दोन्ही फरार आरोपींच्या शोधासाठी पाेलीस कोठडीची मागणी करण्यात आली असता, न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ऑर्थर रोडहून आणले न्यायालयातगँगस्टर रवी पुजारी सध्या ऑर्थर रोड कारागृहात असून, शुक्रवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास मुंबई पोलिसांनी त्याला कडेकोट बंदोबस्त व पुरेपूर गोपनीयता पाळत सहायक पोलीस आयुक्त सोपान निगोट व सुमारे पन्नास सशस्त्र पोलिसांनी नाशिक न्यायालयात सव्वाअकरा वाजता हजर केले. न्यायालयीन प्रक्रिया आटोपताच पुन्हा त्याला मुंबईला नेण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय