शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

...अनेकविध समस्यांच्या विळख्यात ‘गंगोत्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:32 IST

नाशिक : पावसाचे पाणी थेट घरात... निवासस्थानांना चहुबाजूंनी रानगवताचा विळखा... सर्प, किडे, अळ्या अन् डासांचे साम्राज्य... ड्रेनेजचा अभाव...घरांच्या छतांवर गाजरगवताचे लॉन्स अन् वीस वर्षे जुनी वायरिंग अशा एक ना अनेक समस्यांचा विळखा जलसंपदा विभागाच्या द्वितीय, तृतीय श्रेणींमधील कर्मचारी वास्तव्यास असलेल्या ‘गंगोत्री’ या शासकीय वसाहतीला वर्षानुवर्षांपासून पडलेला आहे.

ठळक मुद्देलाखोंची दुरुस्ती कागदावरच : भीतीपोटी कर्मचारी झोपताना कानात टाकतात कापसाचे बोळे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पावसाचे पाणी थेट घरात... निवासस्थानांना चहुबाजूंनी रानगवताचा विळखा... सर्प, किडे, अळ्या अन् डासांचे साम्राज्य... ड्रेनेजचा अभाव...घरांच्या छतांवर गाजरगवताचे लॉन्स अन् वीस वर्षे जुनी वायरिंग अशा एक ना अनेक समस्यांचा विळखा जलसंपदा विभागाच्या द्वितीय, तृतीय श्रेणींमधील कर्मचारी वास्तव्यास असलेल्या ‘गंगोत्री’ या शासकीय वसाहतीला वर्षानुवर्षांपासून पडलेला आहे.त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला लागून असलेल्या गंगोत्री वसाहतीत विविध नागरी सोयीसुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते. वारंवार अर्जफाटे करूनसुद्धा संबंधित खात्याच्या निर्धावलेल्या अधिकारीवर्गाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.दरमहा देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येकी आठशे ते नऊशे रुपये पगारातून कपात केली जात असली तरीदेखील वसाहतीची कुठल्याही प्रकारची देखभाल संबंधित विभागाकडून होत असल्याचे सद्य:स्थितीत असलेल्या अवस्थेवरून स्पष्ट होते.एक मजली वसाहतीत एकूण ३२ ते ३५ सदनिका उभारण्यात आल्या आहेत. या सदनिकांमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून कर्मचारी आपापल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सध्या वर्ग-२ व वर्ग-३चे कर्मचारी येथे राहत असून, त्यांचे २० ते २५ कुटुंबे आहेत. वर्षाकाठी देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत असला तरी त्याचा कुठलाही लाभ ‘गंगोत्री’ला अद्याप मिळालेला नाही. यामुळे गंगोत्रीला मागील आठ ते दहा वर्षांपासून लागलेले समस्यांचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही.टेंडर निघाले तर मग गेले कोठे?‘‘गंगोत्री’ला लागलेले विविध समस्यांचे ग्रहण सुटावे, कर्मचाºयांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी लाखो रुपयांचे टेंडर दोन वर्षांपूर्वी काढले गेले, मात्र त्या टेंडरपैकी ना बगीचा झाला, ना रस्ते, ना इमारतींची दुरुस्ती; तर मग टेंडर गेले कुणीकडे? असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.सदनिकांना गळती अन् वारंवार शॉर्टसर्किट‘गंगोत्री’च्या नशिबी आलेल्या विविध समस्यांपैकी एक म्हणजे येथील इमारतींचा रंग अन् विविध सदनिकांमध्ये गळणारे पावसाचे पाणी. यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. घरांमधील वायरिंग जुनाट झाल्याने वारंवार शॉर्टसर्किट होते, यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. वसाहत केवळ नावाला असून, या वसाहतीत रस्ते नाही अन् सदनिकांमधील शौचालय, बाथरूमचीसुद्धा पुरती वाट लागल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HomeघरRainपाऊस