गंगापुरचा जलसाठा ६३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:27+5:302021-07-26T04:14:27+5:30

शहर व परिसरात अधूनमधून ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव शनिवारप्रमाणेच नाशिककरांना अनुभवयास आला. अवघ्या पाच ते दहा ...

Gangapur's water storage at 63% | गंगापुरचा जलसाठा ६३ टक्क्यांवर

गंगापुरचा जलसाठा ६३ टक्क्यांवर

googlenewsNext

शहर व परिसरात अधूनमधून ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरींचा वर्षाव शनिवारप्रमाणेच नाशिककरांना अनुभवयास आला. अवघ्या पाच ते दहा मिनिटांसाठी वेगाने सरी काेसळल्यानंतर काही मिनिटांकरिता सूर्यप्रकाशदेखील शहरासह काही उपनगरांमध्येही पहावयास मिळाला. दिवसभरात ४.० मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.

शहरात गुरुवारपासून पावसाने उघडीप दिली होती; मात्र शनिवारपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात कोठे दमदार मध्यम सरींचा वर्षाव तर कोठे हलक्या सरींचा वर्षाव होत असल्याने नाशिककरांना पावसाळा अनुभवयास मिळत आहे. शहरासह उपनगरांमधील रस्त्यांवरून पाणी वाहत असून, सर्व परिसर ओलाचिंब भिजलेला नजरेस पडत आहे. हवामान खात्याकडून नाशिकमध्ये येत्या मंगळवारपर्यंत (दि.२७) हलक्या ते मध्यम सरींचा कमी-अधिक प्रमाणात वर्षाव होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यताही वर्तविली गेली आहे.

नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा रविवारी ६१, तर रात्री ६३.६२ टक्के इतका झाला होता.

--इन्फो--

धरण परिसरातील पाऊस असा...

गंगापूर-४० मिमी

काश्यपी-१७मिमी

गौतमी-३० मिमी

त्र्यंबक-२९ मिमी

आंबोली- ४८ मिमी

-

Web Title: Gangapur's water storage at 63%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.