शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूररोड : २१ दिवसांत देहविक्रयचा तीसरा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 17:13 IST

गंगापूर रोडवरील एका व्यावसायिक संकुलात मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रयच्या अड्डयावर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी तीन पीडित तरूणींची सुटका केली आहे.

ठळक मुद्देमंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वरील ठिकाणी छापाजानेवारीपासून ही तीसरी कारवाई

नाशिक : गंगापूररोड परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात मसार्ज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रयचा व्यवसाय पोलिसांनी बुधवारी (दि.२०) रात्री पुन्हा एका धाड मारून थांबविला. पंधरवड्यानंतर पोलिसांची ही दुसरी तर जानेवारीपासून ही तीसरी कारवाई आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूर रोडवरील एका व्यावसायिक संकुलात मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहविक्रयच्या अड्डयावर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणाहून पोलिसांनी तीन पीडित तरूणींची सुटका केली आहे. दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका महिलेस अटक केली आहे. जयश्री सोमनाथ अहिरे (३३, रा. उत्तमनगर) व ज्योत्स्ना राजेंद्र नाईक (रा. गंगापूर रोड) अशी संशयित महिलांची नावे आहेत. यातील अहिरे ही मुख्य संशियत असून,नाईक या गाळामालक आहे.गंगापूररोडवरील रचना कॉम्प्लेक्सच्या तळ मजल्यावरील गाळा क्रमांक ५ व ६मध्ये वीशीतल्या पिडीत तरूणींकडून मसाज पार्लरच्या नावाखाली संशयित अहिरे वेश्या व्यवसाय करवून घेत होती. याबाबतची गोपनीय माहिती गंगापूर पोलिसांना मिळताच त्यांनी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वरील ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात तीन पीडित तरूणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले. कॉलेजरोड, गंगापूररोड, महात्मानगर या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसराला मसाजपार्लर व स्पाच्या नावाखाली चोरीछुप्या पद्धतीने देहविक्रय व्यवसायाचा ‘डाग’ लागला आहे. दिवसेंदिवस या भागात हा व्यवसाय फोफावत चालल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अशा अवैध व्यवसायांवर छापे मारले जात असतानाही संबंधितांकडून सर्रासपणे या भागात राजरोस देहविक्रयचा व्यवसाय चालविण्याचे धाडस कोणाच्या आशीर्वादाने केले जाते? असा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.२१ दिवसांत तीन अड्यांवर छापेमारीगंगापूररोडवरील एसटी कॉलनीच्या परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसºया मजल्यावरील सदनिकेत एका मसाजपार्लरमध्ये युवतींकडून बळजबरीने देहविक्रयचा व्यवसाय सुरू होता. यानुसार पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी छापा मारला होता. तसेच ४ फेबु्रवारी रोजी जुना गंगापूरनाका परिसरातील एका अपार्टमेंटच्यासदनिकेत साडी विक्रीच्या व्यवसायासाठी एकत्र येत आल्याचा बनाव करत देहविक्रयचा व्यवसाय राजरोसपणे चालविणा-या महिला, पुरूष दलालांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी मंगळवारी अशाच पध्दतीची कारवाई करत देहविक्रयचा व्यवसाय रोखला.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय