शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर दिवसभर पावसाची रिपरिप : गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 01:10 IST

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असल्याने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ झाली असून तो ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असल्याने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ झाली असून तो ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होत असताना नाशिकमध्ये मालेगावातील साकोरा तसेच नांदगाव आणि मनमाडमध्ये अतिवृष्टी झाली. नाशिक शहरात मात्र त्या तुलनेत कमी पाऊस असून रात्री किंवा सकाळी पावसाची रिपरिप सुरू असते आणि सायंकाळी पुन्हा पाऊस होतो. मात्र हे प्रमाण फार नाही. मात्र, गणेशोत्सव सुरू होऊन दुसरा दिवस सुरू होताच, पावसानेही आपली हजेरी कायम ठेवली. शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी काही वेळ कोसळलेल्या पावसाने रात्रीतून अधून मधून हजेरी लावली. मात्र, शनिवारी पहाटेपासूनच शहर व परिसराला झोडपून काढले. सकाळी दोन तास विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. सध्या गणेशोत्सव सुरू झाल्याने पावसाच्या संततधारेमुळे गणेश मंडळांची धावपळ उडाली. अनेकांनी मंडपाला प्लास्टिकची आच्छादने टाकली तर काही मंडळांच्या आरासवर ही त्याचा परिणाम झाला. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहण्यासाठी नागरिक भ्रमंती करतात. शनिवार हा शासकीय सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी सायंकाळी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठा ही लवकरच बंद झाल्या. पावसामुळे शहरातील मार्गावर पाणीच पाणी झाले आणि अनेक भागात नाले ही वाहू लागले आहेत.नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा वाढला असून तो आता ९४ टक्के इतका झाला आहे. नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.धरणातून विसर्ग होण्याची शक्यता...गंगापूर धरणातील साठा ९४ टक्के इतका असून रात्रीतून पाऊस झाल्यास त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून गोदापात्रात विसर्ग होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashikनाशिक