शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण भरले ९३ टक्के, ४२ हजार क्युसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:17 IST

नाशिक- नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या महापुरामुळे आसाराम बापु पुलासह गाडगे महाराज पुल आणि बहुतांशी सर्वच पुल पाण्याखाली गेले आहे. होळकर पुलाच्या तळाला पाणी लागले आहे.

ठळक मुद्दे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यताआसारामबापु, गाडगे महाराज पुल पाण्याखालीसुयोजित गार्डन, रामवाडीत शिरले पाणीनासर्डी नदीवरील अनेक पुलांवरून पाणी

नाशिक-नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात ९३ टक्के साठा झाला असून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने शहरातील गोदावरी नदीला पुर आला आहे. दुपारी सवा बारा वाजता धरणातून ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने २००८ सारख्या महापुराची भीती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या महापुरामुळे आसाराम बापु पुलासह गाडगे महाराज पुल आणि बहुतांशी सर्वच पुल पाण्याखाली गेले आहे. होळकर पुलाच्या तळाला पाणी लागले आहे.गोदाकाठी रामवाडीपासून सराफ बाजारात सर्वत्रच पाणी शिरले असून नागरीकांची धावळ उडाली आहे. शहरातील उपनगरात देखील पावसामुळे नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्यांना पुर आला असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी गेल्याने उंटवाडी पुल, शिवाजी वाडी, पिंपळगाव खांब याभागातील संपर्क खंडीत झाला आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा कहर कायम असून दिवसांपासून गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला जात असून सकाळी प्रारंभी २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तो वाढवून ४२ हजार क्युसेक पाण्यात वाढवण्यात आला आहे. २००८ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले होते. त्यानंतर प्रथमच इतके पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीला पुर आल्याने आनंदवल्लीचा जुना पुल, आसाराम बापु पुल, फॉरेस्ट्र नर्सरी, रामवाडी गाडगे महाराज पुल यासाह अन्य अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. कपालेश्वराच्या आठ पायऱ्या तर सरकारवाड्याच्या तीन पायºया पाण्याखाली गेल्या आहेत. फॉरेस्ट नर्सरी पुलाच्या परीसरत सुयोजित गार्डन, सामाजिक वनीकरणाची रोपवाटीका यात पाणी शिरले आहे. याशिवाय रामवाडी, गंगावाडी, सराफ बाजार येथे देखील पाणी शिरले आहे.उपनगरातही समस्यानासर्डी नदीला पुर आल्याने नाशिक शहरानजीकच्या तिरडशेत, पिंपळगाव बहुला परीसरात पाणी शिरले आहे. नासडी नदीला पाणी वाढल्याने उंटवाडी तसेच तिडके कॉलनीतील मिलींद नगर पुल पाण्याखाली गेला असल्याने संपर्क खंडीत झाला आहे. सीटी सेंटर मॉल चौकात पाणी साचल्याने देखील वाहतुक ठप्प झाली आहे.नाशिकरोडला रहीवाशांचे स्थलांतरनाशिकरोड देवळाली गाव परीसरात वालदेवी नदीला आलेल्या पुरामुळे रोकडोबावाडी येथील नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. देवळाली गाव तसेच विहीत गाव येथील दशक्रिया विधी शेड पाण्याखाली गेले आहे.भगुर शहरात नुकसानरात्रभरच्या पावसामुळे भगूर येथील क्रांती चौकातील रामदास कासारयांचे दोन रूमचे घर सकाळी पडले. यात जीवीत हानी झाली नसली तरी ६० ते ६५ हजाराचे नुकसान झाले आहे. या भागातील स्मशान भूमीत देखील पाणी शिरले आहे.वडाळा गाव पसिरात परिसरात पाणीवडाळागाव, साईनगर, विनय नगर, शिवाजीवाडी, भारत नगर या भागात पाणीच पाणी झाले आहे. नासर्डी नदीवरील शिवाजी वाडी तसेच पखाल रोडवरील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील संपर्क खंडीत झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसfloodपूर