शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण ५० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:29 IST

मागीलवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली आहेत. मेअखेरपर्यंत धरणात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणात आताच ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. सन २०१८-२०१९ मध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठा ३८ टक्केइतकाच होता.

ठळक मुद्देसमाधानकारक : समूहात सुरू झालेल्या पावसाने वाढली पातळी

नाशिक : मागीलवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली आहेत. मेअखेरपर्यंत धरणात जवळपास ३५ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणात आताच ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. सन २०१८-२०१९ मध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठा ३८ टक्केइतकाच होता.गंगापूर धरणसमूहात गंगापूर, कश्यपी, गौतमी-गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश आहे. समूहातील एकूण पाणीसाठा ३४ टक्के इतका झाला आहे. त्यामध्ये गंगापूर धरणात ५०, कश्यपी धरणात २२, गौतमी गोदावरीत १९ टक्के पाणीसाठा सद्यस्थिती आहे. सध्या फक्त नांदुरमधमेश्वर धरण प्रकल्पातून ८०७ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळपासून येथून विसर्ग करण्यात येत आहे.जिल्ह्यातील पाण्याची तहान भागविणाऱ्या लहान-मोठ्या २४ धरण प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३३ टक्के इतका पाणीसाठा आहे. ६५ हजार ८१८ दलघफू इतकी या प्रकल्पांमध्ये क्षमता असून, सद्यस्थितीत २१ हजार ६३८ इतका उपयुक्त जलसाठा आहे.गेल्या एक तारखेपासून नांदुरमध्यमेश्वरमधून करण्यात येणारा विसर्ग कमी अधिक प्रमाणात नवव्य दिवशीही कायम आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरणRainपाऊस