शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ सेवामार्गाच्या वतीने गंगापूजन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:54 IST

नाशिक : यंदा वरुणराजाने कृपा करावी, तसेच पर्जन्याबरोबरच समृद्धीदेखील यावी यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, श्री ...

ठळक मुद्देयंदा साध्या पद्धतीने : हजारो सेवेकऱ्यांची ऑनलाइन हजेरी

नाशिक : यंदा वरुणराजाने कृपा करावी, तसेच पर्जन्याबरोबरच समृद्धीदेखील यावी यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि गंगा गोदावरी पुरोहित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.१५) गंगापूजन करण्यात आले.

यावेळी गुरुमाउली प.पू. अण्णासाहेब मोरे यांनी मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत सपत्नीक गंगापूजन करीत प्रामुख्याने भारत कोरोनामुक्त व्हावा यासाठी लाखो सेवेकऱ्यांच्या वतीने गंगा गोदावरीमातेस साकडे घातले.ज्येष्ठ शुद्ध १ ते १० या दहा दिवसांत गंगा गोदावरीमाता उत्सव व गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. गंगामाई सर्वांचा उद्धार करणारी, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी, जीवसृष्टी, प्राणिमात्रांना संजीवनी देणारीआहे. त्यामुळे गोदामातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्थसेवामार्गाच्या वतीने दरवर्षी गंगापूजन सोहळा संपन्न होतो. हजारो सेवेकरी रामकुंडावर एकत्रितपणे या सोहळ्याच्या निमित्ताने पर्जन्यराजास विनंती करतात, तसेच रामकुंड व आपापल्या गावातील नदीवर लाखो सेवेकरी पूजन करतात.त्यानुसार मंगळवारी गुरुमाउलींनी गोदामातेचे पूजन करून विनंती केलीच; परंतु सध्या जगासमोर जे भयानक संकट कोरोनाच्या रूपाने उभे आहे, त्यातून सर्वांना दिलासा मिळावा यासाठीसुद्धा साकडे गंगामाईस घालण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महेश हिरे हे उपस्थित होते.दरम्यान, रामकुंडावर झालेल्या कार्यक्रमात मोजक्याच लोकांनी हजेरी लावली; पण देशभरातील लाखो आबालवृद्ध सेवेकऱ्यांनी ऑनलाइन हजेरी लावली.दरवर्षी गंगापूर रोडवरील उदयनगर केंद्रातून गंगाजल कलशाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते; परंतु यावर्षी हा कलश चारचाकी वाहनातून रामकुंड येथे आणण्यात आला. याप्रसंगी मास्क, सुरक्षित अंतर या गोष्टींचे कडक पालन करण्यातआले.

टॅग्स :godavariगोदावरीRainपाऊस