त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाळातील स्नान माहात्म्य असलेल्या तीर्थराज कुशावर्त, गोदावरी उगम स्थानाचे पवित्र जल व तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीतील माती अयोध्या येथील श्री राममंदिराच्या होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी रवाना करण्यात आले आहे.येत्या बुधवारी (दि. ५) अयोध्या येथे श्री राममंदिराचा पायाभरणी समारंभ होत आहे. या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे पवित्र जल व त्र्यंबकेश्वर नगरीतील माती या कार्यक्र मासाठी विधिपूर्वक पूजन करून त्र्यंबकेश्वहून रवाना करण्यात आले. पुरोहित संघ व अयोध्येत कारसेवेप्रसंगी गेलेले श्रीरामभक्त कारसेवक व मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ब्रह्मगिरीवरून आणलेल्या मूळ गोदावरीच्या तीर्थाचे व कुशावर्त तीर्थाचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले, तर अयोध्या येथील श्रीराममंदिर भूमिपूजन समारंभास महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित असलेले १००८ महंत जितेंद्रनाथ महाराज, अमरावती यांच्याकडे ते कलश सुपूर्द करण्यात आले. हा कलश ४ आॅगस्ट रोजी आयोध्येत पोहोचणार असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली. पौरोहित्य लोकेशशास्री अकोलकर यांनीकेले.याप्रसंगी पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष मनोज थेटे, बापू पेंडोळे, सुनील लोहगावकर, बाळासाहेब कळमकर, श्रीनिवास गायधनी, उदय थेटे, श्रीपाद अकोलकर, दिलीप लोहगावकर, मोहन लोहगावकर, गुलाब शेटे, देवयानी निखाडे, चंद्रकांत प्रभुणे, दिगंबर शिखरे, राजाभाऊ जोशी आदी उपस्थित होते.
गंगा-गोदावरी उगमाचे जल अयोध्येकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:38 IST