शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गंगा-गोदावरी आरतीला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:32 IST

बनारस, हरिद्वार तसेच काशी येथे होणाऱ्या गंगा आरती प्रमाणे आता नाशिकला ही भव्यदिव्य स्वरूपात गंगा आरतीचा मुहूर्त लागला आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून रामकुंड येथे दैनंदिन भव्य दिव्य अशा स्वरूपात गंगा आरती केली जाणार

पंचवटी : बनारस, हरिद्वार तसेच काशी येथे होणाऱ्या गंगा आरती प्रमाणे आता नाशिकला ही भव्यदिव्य स्वरूपात गंगा आरतीचा मुहूर्त लागला आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून रामकुंड येथे दैनंदिन भव्य दिव्य अशा स्वरूपात गंगा आरती केली जाणार असून, यासाठी शासनाने मान्यता व त्यासाठी निधीही मंजूर केला आहे. या संदर्भात रूपरेषा ठरविण्यासाठी पुरोहित संघ, धार्मिक संघटनांची संयुक्त बैठक घेण्यात आली.गेल्या अनेक वर्षांपासून बनारस, हरिद्वार, काशीच्या धर्तीवर दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाºया गोदावरीचीही दररोज आरती केली जावी अशी मागणी केली जात होती. नाशिकचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी गोदावरीची दररोज आरती केल्यास त्याचा लाभ होईल अशी बाजू पर्यटन विकास महामंडळाकडे मांडण्यत आली. शासनाने त्याला तत्त्वता मान्यताही दिली असल्याने काही वर्षापूर्वी नाशिक महापालिकेच्या पुढाकाराने काही महिने गंगा आरती सुरू करण्यात आली होती.गुरुवारी दुपारी पुरोहित संघाच्या कार्यालयात सतीश शुक्ल, आमदार बाळासाहेब सानप, पोलिस निरीक्षक कैलास पाटील आणि पुरोहित संघ यांच्यात बैठक होऊन त्यात आमदार सानप यांनी बनारसच्या धर्तीवर आता नाशिकलादेखील भव्य स्वरूपात गंगा आरती होणार असून, शासनाने मान्यता देत निधी मंजूर केला असल्याचे सांगितले. पुरोहित संघाकडून गेल्या साथ ६० वर्षांपासून गंगा आरती सुरू असून, आता बनारस धर्तीवर गंगाआरती होणार असल्याने आरतीचे स्वरूप बदलणार आहे. या आरतीच्या शुभारंभाच्या निमित्ताने ९ सप्टेंबर रोजी दुपारी सरदार चौक येथून शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यानंतर गोदेच्या किनारी रामकुंडावर गंगा आरती होणार आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान गंगा आरतीला महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानंतर मात्र ही आरती बंद पडली. पुन्हा ही मागणी धरू लागल्याने शासनाने अखेर या मागणीची दखल घेत गोदावरी आरती करण्यास मंजुरी देण्यात आली असून, येत्या ९ सप्टेंबरपासून दररोज सायंकाळी आरती करण्यात येणार आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNashikनाशिक