पंचवटी : आडगाव नाका येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिमय तसेच उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमेनिमित्ताने सकाळी पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते. कार्तिक मासानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अखंड रामायण पाठाचा यावेळी समारोप करण्यात आला.सकाळी देवाला ५६ भोग प्रकारचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. त्यानंतर सुंदरकांड पूजन कार्यक्र म संपन्न झाला. दुपारी भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात येऊन महाप्रसाद वाटप कार्यक्र म झाला. शुक्र वारी (दि.२३) सायंकाळी ७ वाजता पंचमुखी हनुमानभक्त परिवाराच्या वतीने साधू-महंतांच्या हस्ते रामकुंड येथे सामूहिक गंगा आरती करण्यात आली. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास, राजारामदास आदींसह शेकडो भाविक उपस्थित होते.त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलेली होती. तसेच दिवसभर भजन संध्या कार्यक्र म संपन्न झाला कार्यक्र माला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचमुखी हनुमानभक्त परिवारातर्फे गंगा आरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:39 IST
आडगाव नाका येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिमय तसेच उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमेनिमित्ताने सकाळी पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते.
पंचमुखी हनुमानभक्त परिवारातर्फे गंगा आरती
ठळक मुद्देत्रिपुरारी पौर्णिमा : विविध धार्मिक कार्यक्र म