विंचूर/लासलगाव : येथून चोरीस गेलेल्या दुचाकीचा तपास करीत असताना सराईत दुचाकी चोरणाऱ्या टोळीस लासलगाव पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयितांनी इतर ठिकाणाहून चार ते पाच दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. लासलगाव पोलीस स्टेशनला सुभाष गुजर (रा. विंचूर) यांच्या फिर्यादीवरून ६६०/२०२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे मोटारसायकल चोरीचा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे करीत होते. पथकाने विष्णूनगर पाबळवाडी येथील संशयित सोमनाथ धोंडीराम हगवणे (२६), गणेश बाळू गवळी (२३), रा. विंचूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यांनी त्यांचा साथीदार संजय ऊर्फ बाळा छबू पवार, वय २६ वर्षे (रा. निमगाव वाकडा, ता. निफाड) याच्या मदतीने लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतुन ३ दुचाकींची चोरी, तसेच येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून एका दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर संशयितांनी पोलीस स्टेशन हद्दीतून इतर दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने आरोपीस २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात दिली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे करीत आहेत.
-------------------------
मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीसमवेत सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, अजिनाथ कोठाळे, पो.ना. राजेश घुगे, पो.ना. योगेश शिंदे, पो.ना. कैलास महाजन, पो.काॅ. प्रदीप आजगे आदी. (२४ विंचूर)
240721\24nsk_1_24072021_13.jpg
२४ विंचूर