शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दरोडाच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 20:08 IST

लासलगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश करीत कारसह १,३ ९, ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देलासलगाव : सराईत गुन्हेगारांना लासलगाव पोलिसांनी केले चर्तूभुज

लासलगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश करीत कारसह १,३ ९, ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.मंगळवारी (दि.१९) कोजागिरी पौर्णिमा व ईद ए मिलाद सणाचे निमित्ताने नाशिक जिल्हयात पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड सोमनाथ तांबे यांनी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, स.पो.उ.नि. शिवाजी घोडे, पोलीस नाईक राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास महाजन, संदिप शिंदे, पोलीस कॉन्टेबल प्रदिप आजगे, सागर आरोटे, संजय देशमुख असे लासलगाव शहरामध्ये पेट्रोलिंग करत टाकळी विंचुर गांव हद्दीतुन जाणाऱ्या विंचुर - प्रकाश राज्यमार्गावर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ नाकाबंदी सुरु करुन वाहनांची तपासणी करत असतांना चांदवडकडुन लासलगावकडे येणारी एक कार नाकाबंदी पासुन काही अंतरावर थांबुन त्यांचे ताब्यातील वाहन वळवून पुन्हा चांदवड बाजुकडे पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागल्याने त्या वाहनावर संशय आल्याने नाकाबंदी ठिकाणचे अधिकारी / अंमलदार यांनी वाहनाकडे पळत जात वाहन थांबविले.त्यावेळी त्यामध्ये असलेल्या इसमांनी पळण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी ६ जणांना ब्यात घेतले. त्यांची विचारपुस करत असतांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात येताच व नांव, गांव सांगण्यास टाळाटाळ करु लागले.त्यामुळे त्याची व वाहनाची झडती घेतली.त्याठिकाणी कार (एम एच १२ एम बी ४०७१) या वाहनातील लोकांची चौकशी केली असता साबीर शब्बीर कुरेशी (२८) रा. वार्ड नं. २, मटन मार्केट समोर, श्रीरामपुर, जि. अहमदनगर, सर्फराज बाबा शेख (१९) रा. वार्ड नं. २, पाण्याचे टाकीजवळ, श्रीरामपुर, कुर्बान इस्माईल शेख, (२३) रा . वार्ड नं. २, सुन्नाभाई यांच्या वखारीजवळ, श्रीरामपुर, सनीराज विलास ढोंकणे, (१९) रा. सरस्वती कॉलनी, कालव्याजवळ, श्रीरामपुर, सागर ऊर्फ संदिप सुरेश कांबळे, (२६) रा. रामनगर, वार्ड नं. १, इदगाह मैदानालगत,श्रीरामपुर, (वाहन चालक), योगराज मोहन सोनवणे, (२४) रा. वार्ड नं. २, मटन मार्केट जवळ, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर अशी नावे सांगितली. तर वाहनाची झडती घेता वाहनामध्ये दरोडा टाकण्याचे साहित्य आढळली.या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रदिप आजगे यांच्या फिर्यादीवरुन लासलगाव पोलिस स्टेशनला या सर्वांच्या विरुध्द भा.द.वि. कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या इसमांची तांत्रिक माहिती प्राप्त केली असता त्यांच्या विरुध्द गंभीर स्वरुपाचे या अगोदर श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर येथे गुन्हे दाखल असल्यााची माहिती मिळाली. आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उप निरीक्षक देविदास लाड हे करीत आहे. (२० लासलगाव ३)

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी