शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूररोडवरील व्यावसायिकावर टोळक्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 16:02 IST

सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तिघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. दोन मोटारीतून आलेल्या या टोळक्याने गैरकायदानुसार गर्दी जमवून मारहाण करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गादी-सोफे तयार करण्याच्या कारणावरून मारहाण सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे

नाशिक : गंगापूररोडवरील एका कुशनच्या दुकानावर मारुती स्विफ्टमधून आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हल्ला करत व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूररोडवरील आनंदवल्ली शिवारात असलेल्या एका कुशनच्या दुकानावर टोळक्याने येऊन गोंधळ घालत लाकडी दंडुक्याने मारहाण केल्याची फिर्याद व्यावसायिक सद्दाम अब्दुलरहेमान खान यांनी दिली आहे. मारुती स्विफ्टमधून आलेले (एम.एच.०६ ए.डब्ल्यू १५०६) व (एम.एच.०६ ए.डब्ल्यू १५०६) संशयित मोहम्मद मुस्तुफा खान, गणी करम खान, अब्दुल शेख, आजम खान, इकरार, खान, इबरार खान, इस्त्रार खान, अन्वर खान (सर्व रा. खोडेनगर, मिल्लतनगर वडाळा शिवार) यांनी गादी-सोफे तयार करण्याच्या कारणावरून फिर्यादी खान यास मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी खान यांचा चुलत भाऊ भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान, सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तिघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. दोन मोटारीतून आलेल्या या टोळक्याने गैरकायदानुसार गर्दी जमवून मारहाण करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक