शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 17:01 IST

बाप्पांचे चाकरमान्यांबरोबर अपडाऊन

मनमाड (नाशिक) :  मनमा- कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये आज नगराध्यक्ष पद्मावती धात्रक व माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या हस्ते गणेश मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. गोदावरी गणेश मंडळाचे यंदाचे २३ वे वर्ष असून दहा दिवस गणरायांचा चाकरमान्यांबरोबर मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास घडणार आहे.

   गणरायाच्या स्वागतासाठी पास बोगीमधे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेशाचे पोस्टर लावून समाजप्रबोधनाचं काम या माध्यमातून केले जाते. यंदा स्वच्छता आणि शौचालयासंदर्भात पोस्टर लावण्यात आले आहे. ‘पोषक आहार देऊ या, सुदृढ बालक बनवू या’ अशी घोषणा अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांनी  दिल्या. दररोज गाडीची वेळ होताच गाडी मार्गस्थ होते आणि गणपती बाप्पांचा मनमाड ते कुर्ला असा प्रवास सुरु होतो. प्रत्येक स्टेशनवर चढणारा प्रवासी गणपती बाप्पाचे दर्शन घेतो आणि आमचा प्रवास सुखरुप होऊ दे, प्रवासात कुठलेही विघ्न येऊ देऊ नको, अशी प्रार्थना करतो. 

    गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाकडून यंदा एक क्विंटल दहा किलो गव्हाचे पीठ कोल्हापूर सांगली सातारा येथे असलेल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठविण्यात आले आहे. सर्वधर्मीय नोकरदार, प्रवासी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करून राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखं दर्शन पहावयास मिळते. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राजाभाउ भडके, उपाध्यक्ष शुभम आहिरे, प्रवीण व्यवहारे, सुरज चौधरी, विशाल आहिरे, गोरख खैरे, निलेश शिरसाठ, नरेंद्र खैरे, मुकेश निकाळे, संदिप व्यवहारे, संदिप आढाव, मंगेश जगताप, स्वप्निल म्हस्के, शेखर थोरात, स्वप्निल सरोदे, शुभम दराडे, चेतन मराठे, सुरज शुगवाणी, दुर्मिल शेलार ,धनंजय अव्हाड, भुषण पवार आदी परिश्रम घेत आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सव