कळवण : येथील मुलींसाठी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांचे डिजीटलायेशन करण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला असून त्यापैकी महाराजा कला व क्र ीडा सांस्कृतिक मित्र मंडळाने केलेल्या एका डिजिटल वर्गखोलीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी महाराजा कला क्र ीडा गणेश मंडळाचे अध्यक्ष संदीप पगार होते. डीजीटल वर्गासाठी मदत करणााऱ्या महाराजा मंडळाच्या सदस्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराजा मंडळाचे संस्थापक सतिष पगार, उपाध्यक्ष प्रशांत गोसावी, तसेच निंबा पगार, राज देवरे, निलेश कायस्थ आदी उपस्थित होते. शहरात महाराजा मंडळाच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्र म राबविले जात असून कार्य कौतुकास्पद असल्याचे मुख्याध्यापक अशोक पगार यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिक्षक भरत आहेर , कल्पना पवार , राहूल पगार, डॉ. रवी पाटील,अॅड धनंजय पाटील, संदेश पगार, संदीप पगार, बापू जाधव, मंगेश गांगुर्डे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन रत्ना सुर्यवंशी यांनी केले तर कल्पना पवार यांनी आभार मानले .
वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी गणेश मंडळांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:33 IST
कळवण : महाराजा मंडळामार्फत लोकार्पण
वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी गणेश मंडळांचा पुढाकार
ठळक मुद्देडीजीटल वर्गासाठी मदत करणााऱ्या महाराजा मंडळाच्या सदस्यांचा सत्कार