शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणूक: नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल; अधिसूचना लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 11:31 IST

अनंत चतुर्दशीनिमित्त शहरातून आज (गुरुवार) लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

नाशिक: अनंत चतुर्दशीनिमित्त शहरातून आज (गुरुवार) लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता मिरवणुकीला पारंपरिक पध्दतीने सुरुवात होणार आहे. यानिमित्त शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सकाळी १० वाजेपासून वाहतूक मार्गातील बदलाची अधिसूचना लागू होणार आहे.

विसर्जन मिरवणूक जुने नाशिक, वाकडी बारव, दादासाहेब फाळकेरोड, महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली भाजीबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी.रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट गल्ली, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगणावरून गोदाकाठालगत विसर्जन ठिकाणी पोहचणार आहे.असा आहे वाहतूक मार्गात बदल:

विसर्जन मिरवणुकीदरम्यान, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या सर्व शहर बसेस या पंचवटी आगारातून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व अन्य सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलवरून नाशिकरोड, नाशिक शहर व शहरातील अन्य ठिकाणी जातील. पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका येथून कन्नमवार पुलामार्गे पुढे जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली आहे.आनंदवली- चांदशी गाव रस्ता वाहतुकीसाठी बंद:

आनंदवली, गंगापूररोड परिसरातील बहुतांश गणेश मित्रमंडळांकडून आनंदवली येथील गोदाकाठावर विसर्जनासाठी गर्दी केली जाते. यामुळे चांदशी गावाकडून आनंदवली नदीपात्र ओलांडून आनंदवलीगाव मार्गे गंगापूरला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चांदशीगाव ते आनंदवली अमरधाम हा रस्ता दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहील. नाशिककडे येणारी व नाशिकहून चांदशीकडे जाणाºया वाहनचालकांनी आनंदवली पुलाकडे न जाता चांदशीगाव रोडने नाशिक डावा तट कालवा येथून उजव्या बाजूने वळून कालवामार्गे मखमलाबाद रोडने रामवाडीमार्गे अशोकस्तंभ ते गंगापूररोड या मार्गाने प्रवास करावा, असा पर्यायी मार्ग शहर वाहतूक शाखेने सुचविला आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवNashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी