शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता तपोवनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:10 IST

दरवर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयात गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता थेट पंचवटीतील तपोवनात भरवण्यासाठी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे रस्त्यावर दुकाने थाटण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू संघर्ष आता नक्की काय वळण घेतो याकडे लक्ष लागून आहे.

नाशिक : दरवर्षी जिल्हा शासकीय रुग्णालयात गणेशमूर्ती विक्रीचे गाळे आता थेट पंचवटीतील तपोवनात भरवण्यासाठी देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे रस्त्यावर दुकाने थाटण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू संघर्ष आता नक्की काय वळण घेतो याकडे लक्ष लागून आहे.  गणेशोत्सवाच्या सुमारे पंधरा दिवस अगोदरपासून शहरात गणेशमूर्ती विक्रीला येऊ लागतात. परंतु मुख्यत्वे करून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर मूर्ती विक्रीसाठी आणल्या जातात. त्यावरून वाद होत असतो. सदरचा भाग शांतता क्षेत्र आहे. परंतु त्याठिकाणी दुकाने थाटल्यानंतर पोलीस प्रशासन महापालिकेकडे बोट दाखवते आणि प्रशासन राजकीय दबावाला बळी पडते. शहरातील काही मोजके राजकीय नेते याठिकाणी परस्पर मंडप बांधून दुकाने विक्रेत्यांना भाड्याने देतात. तथापि, रस्त्यावरील गाळे हा वादाचा विषय ठरल्यानंतर असे नेते चोख भूमिका बजावून गाळ्यांना संरक्षण देतात.  सदरची गणेशमूर्ती गाळ्यांना मुळातच गोल्फ क्लब मैदान (इदगाह मैदान) येथे जागा देण्यात आले होते. मात्र एकदा गणेशोत्सवाच्या दरम्यान रमजान ईद आल्याने अडचणीचे कारण पुढे केले गेले आणि त्यावेळी विके्रत्यांना रस्त्यावर दुकाने भरविण्यास मुभा दिली गेली. दरवर्षी या जागेवर स्टॉल उभारण्यामुळे होणार वाद हा शहरात चर्चेचा विषय ठरत असतो.  त्यातून सुरुवातीला ताणतणाव निर्माण होत असला तरी त्यानंतर वातावरण निवळते हा आजवरचा अनुभवआहे. तथापि, यंदा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अगोदरच सदरचे गाळे हे तपोवनातील मोकळ्या जागेवर भरविण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्याचे वृत्त आहे.महापालिकेत आता एकच गणपतीनाशिक महापालिकेच्या वतीने दरवर्षी सहा विभागांत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला जातो. यंदा मात्र प्रथमच केवळ राजीव गांधी भवनात एकच गणपती असणार आहे, असे समजते. बी. डी. भालेकर येथील मैदानात सध्या ई-पार्किंगचे काम सुरू असून, त्यामुळे येथील देखावे अन्यत्र हलविण्याच्या आयुक्तांच्या सूचनेमुळे हा वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील मानाचा गणपती असलेला नाशिक महापालिकेच्या गणपती प्रतिष्ठापनेविषयी शंका निर्माण झाली होती. मात्र प्रशासन उपआयुक्त महेश बच्छाव यांना आयुक्तांनी मुख्यालयात गणपती उत्सव कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Ganpati Utsavगणपती उत्सव