शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भालेकर मैदानावरील गणेशोत्सव वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:24 IST

शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह, तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी, असा ठराव करण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्मार्ट पार्किंगचा अडथळा स्थायित ठराव, आयुक्त तपासणी करणार

नाशिक : शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह, तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी, असा ठराव करण्यात आला आहे. स्मार्ट पार्किंग असलेल्या या मैदानावर खड्डे न खोदताच मंडप उभारण्याची हमी घ्यावी, असे समिती सभापती उद्धव निमसे यांनी शुक्रवारी (दि. ९) स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले, तर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्मार्ट पार्किंगच्या सेन्सरला धोका पोहोचणार असेल तर परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केल्याने आठ मंडळाच्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.महापालिकेच्या वतीने दरवर्षी विविध भागांत गणेश मंडळांना परवानगी दिली जाते. तथापि, आठ मंडळे हे भालेकर हायस्कूलच्या मैदानातच गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळांना गेल्यावर्षी या जागेत स्मार्ट पार्किंगचे काम सुरू असल्याने विरोधाला सामोरे जावे लागले होते. तत्कालीन आयुक्ततुकाराम मुंढे यांनी विरोध केल्याने मंडळांनी हा धार्मिक कार्यक्रम असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेतली. महाजन यांनी मध्यस्थी केल्याने तिढा सुटला आणि त्याच जागेवर गणेशोत्सव साजरा करण्यात आला. परंतु आता या जागेवर पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यास अडचण उद््भवत आहे. याठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम पूर्ण झाल्याने आता याठिकाणी परवानगी देता येणार नाही असे पत्र पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नरसिंगे यांनी दिले आहे. यामुळे मंडळांनी स्थायी समितीकडे दाद मागितली. शुक्रवारी (दि.९) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या संदर्भात अशासकीय ठराव करण्यात आला. परंतु त्याचबरोबर आयुक्तांनी पाहणी करून निर्णय द्यावा, असे सभापती उद्धव निमसे यांनी सांगितले. विशेषत: खड्डे न करताही याठिकाणी मंडप उभारता येऊ शकतो, असे निमसे यांचे म्हणणे आहे.दरम्यान, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मात्र याठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम झाले आहे. त्यामुळे रिमोट सेसिंगला धोका पोहोचत असेल तर परवानगी दिली जाणार नाही, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.दरवेळीच वाढणार वादस्मार्ट सिटीअंतर्गत भालेकर मैदानावर स्मार्ट पार्किंगचे काम करण्यात आले आहे. याठिकाणी रिमोट सेन्सिंगसह अन्य अद्ययावत यंत्रणा असल्याने आता दरवर्षीच गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGaneshotsavगणेशोत्सव