शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर नसलेल्या पदांवर डॉक्टरांच्या भरतीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:19 IST

नाशिक : किडनी, कॅन्सर व हृदयरोग या गंभीर आजारांवर गोरगरिबांना नाममात्र दरात उपचार घेता यावे यासाठीच कोट्यवधी रुपये खर्च ...

ठळक मुद्देसंदर्भ सेवा : भरतीआड शासनाची फसवणूक

नाशिक : किडनी, कॅन्सर व हृदयरोग या गंभीर आजारांवर गोरगरिबांना नाममात्र दरात उपचार घेता यावे यासाठीच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अनागोंदी कारभारातील गंभीर बाबी दिवसाआड उघडकीस येत असून, हाड, स्त्रीरोग व बालरोगावर या रुग्णालयात उपचाराची पुरेशी व्यवस्था व त्यासाठी तज्ज्ञांची पदे मंजूर नसतानाही गेल्या काही वर्षांपासून या पदांसाठी डॉक्टरांची भरती करण्याचा व त्यांच्या वेतनावर दरमहा लाखो रुपये खर्ची पाडण्याचा प्रकार माहिती अधिकारातून स्पष्ट झाला आहे. मंजूर नसलेली पदे भरण्यामागची कारणे समजू शकली नसली तरी, त्यातून शासनाचीच अप्रत्यक्ष फसवणूक करण्यात आल्याचे उघड उघड दिसू लागले आहे.गोरगरिब रुग्णांवर मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन महागडे उपचार करण्याची वेळ येऊ नये यासाठीच नाशकात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय उभारण्यात आले. विशेष करून कॅन्सर, हृदयरोग व किडनी यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून, उपचारात कोठेही कमतरता राहू नये, यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जात असल्याने अनेक रुग्णांना आजवर जीवदान मिळाले आहे. अन्य आजारांवर उपचारासाठी शासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था बळकट केल्यामुळे याठिकाणी सर्व प्रकारच्या आजारांवर नियमित निदान व उपचार केले जात आहेत. असे असतानाही विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यामागचे कोडे या क्षेत्रातील जाणकारांना अजूनही उलगडलेले नाही.अलीकडेच विचारलेल्या माहिती अधिकारात संदर्भ सेवेने दिलेल्या लेखी उत्तरात रुग्णालयात अस्थिव्यंगोपचार, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञांची पदे मंजूर नसल्याचे म्हटले आहे. ही पदेच मंजूर नसल्यामुळे या पदांवरील नियुक्त केलेल्या डॉक्टरांनी किती रुग्णांवर आजवर उपचार केले व किती रुग्ण बरे होऊन घरी गेले याची माहितीही रुग्णालयाकडे नसल्याचा छातीठोक दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या सात वर्षांपासून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. खिरारी, पाच वर्षांपासून अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजय कुटे व सहा वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ डॉ. कांचन यांची रुग्णालय व्यवस्थापनाने नियुक्ती केली आहे व ते आजही त्यांची सेवा (?) रुग्णालयात येणाºया रुग्णांना देत आहेत.लाखो रुपयांचे पॅकेज देण्याचा पायंडाविशेष म्हणजे अस्थिरोगावर उपचाराची कोणतीही आवश्यक व पुरेशी साधने रुग्णालयात नसतानाही अस्थिरोग तज्ज्ञ गेल्या पाच वर्षांपासून रुग्णांची सेवा करीत असल्याची बाब अधिकच आश्चर्यकारक मानली जात असून, रुग्णालयाचे विद्यमान वैद्यकीय अधीक्षक स्वत: अस्थिरोगतज्ज्ञ असूनही सदरचे पद भरण्याचे कारणच काय, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकीकडे पदे मंजूर नसल्याची कबुली द्यायची व दुसरीकडे तज्ज्ञांची नियुक्ती करून त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज देण्याचा पायंडा संदर्भ सेवा रुग्णालयाने पाडून एकप्रकारे त्या माध्यमातून शासनाची फसवणूकच केल्याचे मानले जात आहे.आरोग्य संचालकांचे दुर्लक्षपदे मंजूर नसणे व रुग्णालयात पुरेशा उपचाराची व्यवस्था नसूनही अस्थिरोग, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची संदर्भ सेवा रुग्णालयात भरती करण्याच्या या गंभीर प्रकाराबाबत आरोग्य संचालकांनाही अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. बुधवारी आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी संदर्भ सेवा रुग्णालयाच्या झाडाझडतीतही सदरचा प्रकार त्यांच्या निदर्शनास न येऊ देण्याची तजवीज घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य