शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून ठरवून पाटील यांचा गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:57 IST

भाजपाअंतर्गत गटबाजीमुळे आणि पक्षाला आव्हान देण्याच्या स्वभावामुळे सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचे भाजपाच्याच गोटातून सांगण्यात येत आहे. सभागृहनेता बदल ही त्याचीच सुरुवात होती

नाशिक : भाजपाअंतर्गत गटबाजीमुळे आणि पक्षाला आव्हान देण्याच्या स्वभावामुळे सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली असल्याचे भाजपाच्याच गोटातून सांगण्यात येत आहे. सभागृहनेता बदल ही त्याचीच सुरुवात होती. परंतु आता महासभेत या नूतन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर न करताही त्यांना केबीन आणि अन्य सुविधाही देण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या वातावरणात दिनकर पाटील हे कळीचे ठरत असले त्यांचे पदाधिकाऱ्यांशी वारंवार खटके उडत होते. गेल्या वर्षीच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव  आणि नंतर स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्या विरोधातील बंड यावरून एकदा रामायण आणि एकदा वसंत स्मृती या दोन्ही ठिकाणी त्यांचे अन्य पदाधिकाºयांशी वाद सुरू झाल्याने त्यावेळेस पासूनच सभागृह नेते पदावरून हटविण्याची तयारी सुरू झाली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेले आंदोलन हे केवळ निमित्त ठरले, असल्याचे दिसते. सभागृह नेतापदी सतीशबापू सोनवणे यांचे नाव प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्याच्या निमित्ताने पश्चिम मतदारसंघातून आले आहे, तर जगदीश पाटील हे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. संभाजी मोरुस्कर यांचे हे पददेखील सहज काढले नसून त्यांच्यावरही अनेक वादांना कारणीभूत ठरविण्यात आले आहे. अर्थात, त्यांना पदे दिल्यानंतर महापौरांनी आणि प्रशासनाने ज्या तडकाफडकी त्यांना केबीन आणि अन्य सुविधा करून दिल्या आहेत. त्यामुळेदेखील आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.महापौरांच्या भूमिकेमुळे आश्चर्यसभागृहनेता किंवा गटनेता या पदासाठी पक्षाने नियुक्ती केल्याचे पत्र मिळाल्यानंतर महासभेत त्याचे वाचन होते आणि त्यानंतर महापौर त्या पदाची घोषणा करतात. कॉँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती होऊनही महापौर रंजना भानसी यांनी मात्र पक्ष गटनेत्याचे पत्र मागितले होते. मात्र सभागृहात घोषणा होण्याच्या आतच दोन्ही पदाधिकाºयांनी आयुक्तांकडे बैठकीत सहभाग घेतला आणि त्यांना दालने दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तथापि, तांत्रिक बाजू तपासली तर सध्या दोन सभागृह नेते आणि भाजपाचे दोन गटनेते असा प्रकार झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका