शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

गेम- कार्टूनशी जमली गट्टी, अभ्यासाशी घेतली कट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:09 IST

अमोल अहिरे जळगाव निंबायती : आम्ही तुमच्या वयाचे होतो, त्यावेळी खूप मन लावून अभ्यास करायचो, आम्हाला घरी दिलेला गृहपाठ ...

अमोल अहिरे

जळगाव निंबायती : आम्ही तुमच्या वयाचे होतो, त्यावेळी खूप मन लावून अभ्यास करायचो, आम्हाला घरी दिलेला गृहपाठ पूर्ण केला नाही तर शाळेत व घरी दोन्ही ठिकाणी कठोर शिक्षा होत असे. तरीदेखील आम्हाला शिक्षकांचा व पालकांचा खूप आदर होता. तुमच्यासारखे तासनतास कार्टून पाहात बसत नव्हतो. हे वाक्य आपल्या लहान मुलांना म्हटले नाही, असे आई - वडील शोधूनही सापडणार नाहीत. सध्या हे चित्र घरोघरी पाहावयास व ऐकावयास मिळत आहे.

आपल्या मुलांना पालक नेहमीच अभ्यासाचे महत्व पटवून देत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. वर्षभरापासून शालेय अभ्यासक्रमात ऑनलाईन शिक्षणाची पद्धती आल्यामुळे मुलांना मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणकावर शिकवले जाते. लेक्चर संपले की, मुले लगेचच गेम, कार्टूनकडे वळतात. त्याचा बालमनावर विपरित परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्षच उडाले आहे. टेलिव्हिजनवरील कार्टून, मोबाईल, गेम्स, व्हिडिओ अशा गोष्टींमुळे मुलांना अभ्यासात गोडी राहिली नाही. त्यामुळे मुलांनी अभ्यासाशी कट्टी व गेम व कार्टूनशी गट्टी केली आहे. अनेक पालक यामुळे त्रस्त झाले आहेत.

अवास्तव गेम, इंग्रजी सिनेमांमधील भडक सादरीकरण, कार्टूनमधील काल्पनिक राक्षस, भूत, शत्रूचे कौर्याचे प्रसंग, त्यातून नायकाच्या व इतर पात्रांच्या अवास्तव शौर्यकथा याचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. आलेले संकट, त्यातून शिताफीने बाहेर पडून शत्रूवर हल्ला करणे. सततचे युद्ध, हाणामारी, लढाईचे प्रसंग, शौर्याचे प्रसंग आदी अवास्तव गोष्टींचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन मुलांमध्ये चंचलवृत्ती, हिंसकपणा, चिडचिडेपणा, वेंधळेपणा, आळशीपणा, नकारात्मक विचार, वडीलधार्‍यांशी अर्वाच्च भाषेत बोलणे, असंस्कृत शब्दांचा वापर करणे, एकत्र राहात असूनही घरात एकमेकांशी संवाद न करणे, घरभर पसारा करणे, सात्विक आहार नाकारून फास्टफूडसाठी हट्ट धरणे, मनाविरुद्ध झाले की, प्रचंड चिडचिड करणे, लहान मुलांना तर जेवताना मोबाईल हातात द्यावा लागतो आदी गोष्टी जाणवू लागल्या आहेत. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

इन्फो...

कोरोनाच्या भीतीमुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मित्रांना भेटता आले नाही. क्रीडांगणावर मनसोक्तपणे खेळता आले नाही. मामाच्या गावाला अथवा इतरत्र कुठेही जाता आले नाही. गार्डनदेखील बंद आहेत. मित्रांना घरी बोलवता येत नाही किंवा त्यांच्या घरी जाता येत नाही, साधी सायकलदेखील चालविता येत नाही. बाबांसमवेत बाजारात जाता येत नाही. आई - बाबा सारखे याला हात लावू नको, त्याच्याजवळ जाऊ नको, गॅलरीत उभा राहू नको, फ्रिजमधील पदार्थ, फळे खाऊ नको, शाॅवरखाली गार पाण्याने आंघोळ करू नको. आंबट नको, गोड नको, तिखट नको, तेलकट नको हे खाऊ नको, ते खाऊ नको असे रागवत असतात. सारखे फोनवर बोलतात, बातम्या पाहतात. त्यामुळे आम्हाला मनोरंजनासाठी एकमेव पर्याय गेम व कार्टूनचा आहे. कधी एकदाचा कोरोना जाईल, याची वाट पाहात आहे.

- आराध्य अहिरे, विद्यार्थी