नाशिक : उंटवाडीरोडवरील क्रांतिनगरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सरकारवाडा पोलिसांनी छापा मारला़ यामध्ये तीन जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे़आदिवासी हौसिंग सोसायटीच्या पाठीमागे सायंकाळच्या सुमारास संशयित मधुकर रावजी लायमन, नितीन शंकर शेट्टी (दोघेही रा़ उंटवाडी रोड, नाशिक) व रवि हनुमंत गुंजाळ (रा़ पेठरोड, पंचवटी) हे तिघे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत होते़ सरकारवाडा पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व पावतीपुस्तक जप्त केले आहे़
जुगार अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत
By admin | Updated: December 26, 2015 00:10 IST