शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:38 IST

वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगत स्वत:च्या फायद्यासाठी हारजित नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि.२१) दुपारी छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पंचवटी : वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगत स्वत:च्या फायद्यासाठी हारजित नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि.२१) दुपारी छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी या संशयितांकडून १५ हजार रुपयांची रोकड व जुगारीचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगतच्या मेरी वॉल कम्पाउंडजवळील भिंतीलगत काही युवक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी महेश साळुंके व त्यांच्या पोलीस पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत जुगार खेळणाºया संशयित बबलू नहिरे, मोहन पाटील, कोमल शेख, भारत पुराणिक, लक्ष्मण पानकर, बाळासाहेब जाधव व प्रशांत वालेकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची रोकड केली आहे. दरम्यान, पंचवटी परिसरात मटका, दारू, पत्त्यांचे क्लब याशिवाय मोबाइलवर रोलेट गेम यांसारखे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे. पोलिसांकडून मटका, जुगार, अड्ड्यांवर छापा टाकला जात असला तरी मोबाइलवर रोलेट गेम चालविणाºया अवैद्य धंदेचालकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.दुचाकी चोरणाºया दोघांना अटकअशोकामार्ग भागातून दुचाकीवरून जाणाºया मित्रांना अडवून चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडून दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली असून, या घटनेतील संशयित आरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या खिशातील पैसेही बळजबरीने काढून घेतल्याचे समोर आले आहे.तुळजाभवानी मंदिराजवळ राहणारा रंगकाम व्यावसायिक संदीप हिरालाल गुप्ता त्याच्या मित्रासमवेत अशोकामार्ग परिसरातून जात असताना संशयित आरोपी सागर मंगेश भडांगे (२३) व दिलीप देवराम महाले (२९) मोठमोठ्याने आरडाओरडा करीत आम्ही पोलिसांना घाबरत नसल्याचे सांगत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी संदीप गुप्ता व त्याच्या मित्रांना अडवून गुप्ता याच्या गळ्याला चाकू लावून दुखापत केली. तसेच त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक एम.एच ४१ एच ६९९ बळजबरीने हिसकावून चोरून नेली. या झटापटीत आरोपींनी गुप्ताच्या मित्राच्या खिशातून पाचशे रुपयेही बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात भडांगे व महाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ यांनी सांगितले.इंदिरानगरमधे विवाहितेची आत्महत्यापाथर्डी रस्त्यालगत साईप्रसाद अपार्टमेंटच्या गच्चीवर एका विवाहितीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पाथर्डी रस्त्यालगतच्या साईप्रसाद अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर ११ मधील रहिवासी मैना विजय धानानी (३४ ) यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. त्यामुळे गंभीर भाजल्या गेल्याने त्यांचा दीर परेश रणछोड धानानी यांनी त्यांना तातडीने मैना रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. जिल्हा रुग्णालयाचील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असल्याचे समजते.मारहाण करणाºया दोघांना चार वर्षे सक्तमजुरीआडगाव नाका परिसरात २३ जानेवारी २०१३ रोजी एका बारमधील मॅनेजरला मारहाण करीत गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायाधीश पांडुरंग घुले यांनी चार वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पंचवटीतील नागचौक येथील सागर गरड, विकी शिंदे, असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. आडगाव नाका येथील पल्लवी बारचे मॅनेजर मनोज साळुंके यांनी या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर मॅनेजर यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केल्याने याचा राग येऊन आरोपींनी लोखंडी गज व काठीने साळुंके यांना बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश देवरे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय