पंचवटी : पेठरोडवरील गजवक्रनगरमध्ये दोन गटांत पूर्ववैमनस्यातून वाद उफाळून आल्याने चौघा संशयितांनी एका घरात घुसून घरातील साहित्य पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत पेठरोड येथे राहणाऱ्या संगीता धोत्रे यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सुनील पवार, संगीता पवार, संजय पवार, पिल्लू पवार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमाराला संशयितांनी धोत्रे यांच्या घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी करून घरातील साहित्य पेटवून दिले.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धोत्रे व पवार या दोन कुटुंबांत वाद सुरू असून, त्यातूनच बुधवारी रात्री ही घटना घडली असावी, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
गजवक्रनगरला घरातील साहित्य जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 00:05 IST