शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर बँकेतील एटीएम फोडणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:34 IST

विंचूर येथील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी लासलगाव पोलिसांनी जेरबंद केली असून, गुन्हा उघड करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.

ठळक मुद्देलासलगाव पोलिसांची कारवाई : मध्य प्रदेशातून पाच जणांना अटक

विंचूर : येथील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी लासलगाव पोलिसांनी जेरबंद केली असून, गुन्हा उघड करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.लासलगाव पोलीस ठाण्याला स्टेट बॅँकेचे विंचूर शाखा व्यवस्थापक स्वप्नील अरुण सोनजे यांच्या फिर्यादीवरून ४,७५,५०० रुपयांची रक्कम चोरी केल्याबाबत दि. ४ फेब्रुवारी २०२० रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे करीत होते. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या आदेशाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व आरोपी पळालेल्या दिशेने जाणाºया राज्यात नाकाबंदी करण्यात आली होती.नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक मागावर असतानाच सदर गुन्ह्यात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा करण्यासाठी यातील आरोपींनी आय ट्वेंटी नवीन कार वापरल्याचे निष्पन्न झाले होते.सदर माहितीच्या आधारे मध्य प्रदेशमध्ये जात असताना टिकमगढ येथील बल्देवगढ पोलीस ठाणे हद्दीत यातील गुन्ह्यातील संशयित साजीद मुस्ताक खान (२० रा. उटावर नगला, जि. मथवाराल, राज्य उत्तर प्रदेश), माजिद जुम्मा खान (१९ वर्षे, रा. पिंपरोडी, जि. नूह, राज्य हरियाणा), जितेंद्र ऊर्फ जितू शंकरसिंग ठाकूर (३० वर्षे, रा. बरोद, जि. ललितपूर, राज्य उत्तर प्रदेश), रोविन रहीस खान (२० वर्षे, रा. आलिमेव, जि. पलवल, राज्य हरियाणा), वसीम अकरम उत्तर हुसेन (२८ वर्षे, रा. टुंडदलाका, जि. नूह, राज्य हरियाणा) असे पाच जण सापडले. त्यांना बल्देवगढ पोलीस ठाणे, जिल्हा टिकमगढ, राज्य मध्य प्रदेश येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लासलगाव पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यातील गेलेल्या रोख रकमेपैकी ३ लाख ७५ हजार रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली आय ट्वेंटी कार, गॅस कटर व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.स्थानिक गुन्ह्यांची कबुलीसदर गुन्ह्याचा लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने तपास चालू असताना यातील आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील एका स्थानिक आरोपीच्या मदतीने विंचूर, ता. निफाड व पिंपळगाव बसंवत, ता. निफाड येथे एटीएममधून पैसे चोरी केली असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपी फरार असून, त्याचा शोध घेणे चालू आहे. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मागर्दनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल करीत आहेत.स्थानिक गुन्ह्यांची कबुलीसदर गुन्ह्याचा लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने तपास चालू असताना यातील आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील एका स्थानिक आरोपीच्या मदतीने विंचूर, ता. निफाड व पिंपळगाव बसंवत, ता. निफाड येथे एटीएममधून पैसे चोरी केली असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपी फरार असून, त्याचा शोध घेणे चालू आहे. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मागर्दनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी