लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : पोलीस आयुक्त परिमंडळ - २ भागातून हद्दपार करण्यात आलेल्या गुड्ड्या ऊर्फ अर्जुन रुंझा पवार याला देवळाली गावातील वडारवाडी भागातून फिरताना पोलिसांनी जेरबंद केले. गुड्ड्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ यांच्यासह महाराष्ट्र शासन तथा कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची अथवा न्यायालयाची कोणत्याही प्रकारची परवानगी गुड्ड्याने घेतलेली नव्हती. असे असताना गुड्ड्या वडारवाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ सोमवारी बाजारात फिरताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उपनगर पोलीस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हद्दपार गुड्ड्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By admin | Updated: May 16, 2017 16:57 IST