शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या अखिर्चित निधीवरून गाजलेल्या स्थायी सभेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी वळविल्याने रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 20:14 IST

अखर्चित निधी खर्च करण्यासाठी मिळालेली डिसेंबरअखेर्पयतची मुदतही संपत आली असताना प्रशासन विभागाकडून अखर्चित निधीचा तपशील स्थायी समितीसमोर मांडण्यास दिरंगाई होत असल्याच्या मुद्दय़ावर जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायीची सभा गाजवली.

ठळक मुद्दे निधी खर्च करण्यासाठी मिळालेली मुदत संपत आलीनियोजनाचा तपशील पुढील सभेपूर्वी सादर करण्याचे आदेशअतिरिक्त निधी मिळविण्यीचा प्रयत्न करण्याचे आश्वासन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडून विविध योजनांच्या प्रस्तांवाची पूर्तता, प्रशासकीय मंजुरी व तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया वेळेत होत नसल्यामुळे अखर्चित निधी खर्च करण्यासाठी मिळालेली डिसेंबरअखेर्पयतची मुदतही संपत आली असताना प्रशासन विभागाकडून अखर्चित निधीचा तपशील स्थायी समितीसमोर मांडण्यास दिरंगाई होत असल्याच्या मुद्दय़ावर जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायीची सभा गाजवली.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची तहकूब करण्यात आलेली सभा व नियमित सभा मंगळवारी (दि.24) घेण्यात आली. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पाटील, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर आदी उपस्थित होते. यावेळी भारपचे गटनेते आत्माराम कुंभार्डे यांनी जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या अखर्चित निधीचा मुद्दा उचलून धरला. शासनाकडून जिल्हा परिषदेला विविध योजनांसाठी मिळालेला निधी खर्च करण्यासाठी डिसेंबरची मुदत दिलेली आहे. परंतु अद्याप सत्तर टक्क्यांहून अधिक निधी अखर्चित असून, प्रशासन विभाग स्थायी समितीला या अखर्चित निधीचा तपशील देऊ शकले नाही. त्यामुळे प्रशासन विभागाने अखर्चित निधीचा तपशील व नियोजन सादर केल्यानंतरच स्थायी समितीची पुढील सभा घेण्याची मागणी त्यांनी केली. विविध योजनांच्या नियोजन व प्रशासकीय मंजुरीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विभाग अधिकाऱ्यांनी मूग गिळून गप्प राहण्याची भूमिका स्वीकारल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी संबंधित योजनांच्या अखर्चित निधी व नियोजनाचा तपशील पुढील सभेपूर्वी सादर करण्याचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना दिले. त्याचप्रमाणो जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकाम व दुरुस्ती योजनेला मिळत असलेला निधी परस्पर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला वळवला जात असल्याने जिल्हा परिषदेच्या विकासकामांवर परिणाम होत असून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला राज्य सरकाने अर्थपुरवठा करावा, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून कपात केली जाऊ नये, असा सूर स्थायी समितीच्या बैठकीत उमटला. त्यासाठी विविध विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांसह पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांसोबत चर्चा करून अतिरिक्त निधी मिळविण्यीचा प्रयत्न करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी यावेळी दिले. दरम्यान, विविध विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागाचा आढवा सादर करताना महत्त्वाच्या विषयांनी माहिती स्थायी समितीसमोर मांडली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिक