शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

चामरलेणीवर अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:23 IST

सायकलिंगची आवड असलेले सिडकोतील चौघे शाळकरी मित्र सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडले. तासाभरात चौघे चामरलेणीच्या पायथ्याशी पोहचले. कोवळ्या उन्हात त्यांनी चामरलेणीच्या पाठीमागील पायवाटेने वर चढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता चौघेही चामरलेणी डोंगरमाथ्यावर पोहचले; मात्र उतरताना उंचीवरून डोळे भिरभिरले आणि वाळलेल्या गवतावरून पाय घसरू लागल्याचे लक्षात येताच ते भेदरले व मदतीसाठी आक्रोश करू लागले. त्यांच्या मदतीसाठी एका युवकाने डोंगरावर धाव घेतली; मात्र पाय घसरल्याने निम्म्यापेक्षा अधिक उंचीवरून तो त्या मुलांदेखत खाली कोसळला. यामुळे शाळकरी मुले अधिक भयभीत झाली होती.

ठळक मुद्देपाय घसरल्याने निम्म्यापेक्षा अधिक उंचीवरून तो त्या मुलांदेखत खाली कोसळलाशाळकरी मुले अधिक भयभीत झाली देवेंद्रचा पाय डोंगरावरून घसरला व तो खाली कोसळला

नाशिक : सायकलिंगची आवड असलेले सिडकोतील चौघे शाळकरी मित्र सोमवारी (दि. २७) सकाळी साडेसहा वाजता घराबाहेर पडले. तासाभरात चौघे चामरलेणीच्या पायथ्याशी पोहचले. कोवळ्या उन्हात त्यांनी चामरलेणीच्या पाठीमागील पायवाटेने वर चढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता चौघेही चामरलेणी डोंगरमाथ्यावर पोहचले; मात्र उतरताना उंचीवरून डोळे भिरभिरले आणि वाळलेल्या गवतावरून पाय घसरू लागल्याचे लक्षात येताच ते भेदरले व मदतीसाठी आक्रोश करू लागले. त्यांच्या मदतीसाठी एका युवकाने डोंगरावर धाव घेतली; मात्र पाय घसरल्याने निम्म्यापेक्षा अधिक उंचीवरून तो त्या मुलांदेखत खाली कोसळला. यामुळे शाळकरी मुले अधिक भयभीत झाली होती.  सिडकोमधील सावतानगर येथील लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारे आर्यन गीते, नयन रोकडे, रोेहन शेळके, आदित्य खैरनार हे चौघे आपापल्या सायकलवरून चामरलेणीला सकाळी पोहचले. पायथ्याला सायकली उभ्या करून चौघांनी लेणीच्या पाठीमागील पायवाटेने चढण्यास सुरुवात केली. एक ते दीड तासात चौघेही लेणीच्या डोंगरमाथ्यावर पोहचले. दरम्यान, लेणी चढताना त्यांना भीती जाणवली नाही; मात्र माथ्यावर पोहचून खाली नजर फिरविल्यानंतर डोळे भिरभिरले आणि चक्कर येऊन पोटात भीतीचा गोळा उठला. यावेळी चौघांनी मदतीसाठी आक्रोश सुरू केला. सदर बाब तीर्थक्षेत्र गजपंथ जैन मंदिराच्या विश्वस्तांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ म्हसरूळ गावातील डोली सेवेकºयांना मदतीसाठी बोलावले. चौघा शाळकरी मित्रांचा आवाज ऐकून पायथ्याजवळ असलेले क. का. वाघ महाविद्यालयातील पदवीचे विद्यार्थी देवेंद्र जाधव, सौरभ पाटील या दोघा मित्रांनी लेणीच्या डोंगरमाथ्याच्या दिशेने धाव घेतली. लेणीच्या उतारावर असलेल्या मंदिरापासून पुढे गेल्यानंतर देवेंद्रचा पाय डोंगरावरून घसरला व तो खाली कोसळला. हे बघून सौरभने तातडीने त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधून अग्निशामक दल व रुग्णवाहिकेची मदत मागितली. मित्र-मैत्रिणींनी तातडीने संपूर्ण घटनेची माहिती अग्निशामक दल व राज्य शासनाच्या ‘१०८’ रुग्णवाहिकेला कळविली. काही मिनिटांतच पंचवटी उपकेंद्राचा बंब व रुग्णवाहिका लेणीच्या पायथ्याशी पोहचली. ...अन् रेस्क्यू आॅपरेशनला आले यश पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ जलद प्रतिसाद पथकाच्या कमांडो पथकाचे अधिक जवान पाचारण करण्याची सूचना बिनतारी संदेश यंत्रावरून दिली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही घटनेची माहिती घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कर्मचाºयांना रवाना केले. जलद प्रतिसाद पथकासह अग्निशामक दलाच्या जवानांनी  ‘मिशन रेस्क्यू आॅपरेशन’ डोंगरमाथ्यावर सुरू केले होते. डोंगरकड्यावरील दगडाच्या आधारे दोरखंड बांधून माथ्यावरून पुलीच्या सहाय्याने कमांडो जवानांनी अडकलेल्या चौघा शाळकरी मुलांना सुखरूपणे सपाट जागेवर उतरविले. साधारणत: पावणे बारा वाजता रेस्क्यू आॅपरेशनला सुरुवात करण्यात आली. दुपारी अडीच वाजता चौघांसह सौरभलाही पायथ्याशी आणले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक