शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिंचलखैरेच्या जिल्हा परिषद शाळेसाठी सुसज्ज इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:36 IST

इगतपुरी : नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आदिवासी भागातील चिंचलखैरे जिल्हा परिषद शाळेसाठी ज्योतिर्मय फाउंडेशन व शिक्षकांच्या सहकार्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआर फंडातून ८० लाख रुपये खर्चून इमारत बांधून दिली आहे.

ठळक मुद्देया इमारतीचे उद‌्घाटन नुकतेच झाले.

इगतपुरी : नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आदिवासी भागातील चिंचलखैरे जिल्हा परिषद शाळेसाठी ज्योतिर्मय फाउंडेशन व शिक्षकांच्या सहकार्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीने सीएसआर फंडातून ८० लाख रुपये खर्चून इमारत बांधून दिली आहे. या इमारतीचे उद‌्घाटन नुकतेच झाले.

ज्योतिर्मय फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र वडनेरे, डॉ. प्रशांत मोरे, मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे, शिक्षक हौशीराम भगत, भाग्यश्री जोशी, नामदेव धादवड, प्रशांत बाबळे, योगेश गवारी यांनी गेल्या वर्षभरापासून नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे शाळेच्या सुसज्ज इमारतीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला प्रतिसाद देत नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून शाळेच्या सात खोल्या, स्वयंपाक खोली, संगणक कक्ष, लॅबोरेटरी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या इमारतीचे उद्घाटन युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे (चेन्नई) जनरल मॅनेजरवाय.के.सिमरे यांनी प्रत्येक वर्गशिक्षकाला दालनाची चावी देऊन केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत मोरे यांचे तर्फे शाळेला बेंच व ग्रीन बोर्ड भेट देण्यात आले. (वा.प्र.)इन्फोसजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूकतत्पूर्वी, गावकऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली. यावेळी कंपनीचेके.वी.आर.कृष्ण, बी.स्वामीनाथन, अनिल नरोलीया, नाशिक विभाग प्रमुखमंगेश मिलखे, वाणी, ज्योतिर्मय फाउंडेशन अध्यक्ष नरेंद्र वडनेरे, विस्तार अधिकारी अशोक मुंडे, केंद्रप्रमुख राजाराम जाधव,मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे,सरपंच मंगाजी खडके,उपसरपंच भाऊ भुरबुडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश भुरबुडे, शिक्षक संघटनेचे झुंबर खेताडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकSchoolशाळा