शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

मोफत अंत्यसंस्कार योजना असताना अंत्यविधी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:07 AM

शहरातील गंगापूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेचा १५ महिन्यांपासून फज्जा उडाला आहे. येथील ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण सांगत २०१७ मध्येच महापालिकेशी पत्रव्यवहार करून ठेका सोडला;

नाशिक : शहरातील गंगापूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार योजनेचा १५ महिन्यांपासून फज्जा उडाला आहे. येथील ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण सांगत २०१७ मध्येच महापालिकेशी पत्रव्यवहार करून ठेका सोडला; परंतु महापालिकेने पुन्हा ठेकेदाराची नेमणूकच केली नसल्याने जुन्याच ठेकेदाराच्या नातलगांकडून येथे लाकडांची विक्री होत असून, एका अंत्यसंस्कारासाठी दोन ते अडीच हजार रुपयांना लाकूड विक्री करण्याचा प्रकार सुरू असल्याने येथील अमरधाममध्ये अंत्यविधी महागले आहेत.  महापालिकेकडून शहरात मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. या योजनेसाठी दरवर्षी ७५ लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांची तरतूद केली जाते. या तरतुदीतूनच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना, आप्तांना अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूड देण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, हा ठेका संपुष्टात आणल्यानंतरही महापालिकेने गंगापूर अमरधामला लाकूड पुरवठा करण्यासाठी नव्याने निविदा काढली नाही. त्यामुळे या ठिकाणी अंत्यविधीच्या लाकडांसाठी जवळपास अडीच हजार रुपयांची मागणी होते.अन्यथा लाकडांची व्यवस्था मृतांच्या नातलगांना करण्यास सांगण्यात येते. विशेष म्हणजे शहरातील पंचवटीआणि नाशिक अमरधाममध्ये  लाकडांचा पुरवठा महापालिकेचे कंत्राटदारच करीत असताना गंगापूर भागातील नागरिकांना मात्र लाकडांचे पैसे मोजावे लागत आहे.  गंगापूर अमरधाममध्ये असलेल्या तीन दाहिन्यांपैकी एकच दाहिनी कार्यरत आहे. उर्वरित दोन दाहिन्यांचे बांधकाम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम किती कालावधीत पूर्ण होणार याकडेही कुणाचेही लक्ष नसल्याने अमरधाममध्ये सर्वत्र बांधकामाचे साहित्य पडलेले आहे. त्यामुळे जणू हे अमरधामच अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी तक्रारी केल्या असतानाही पालिकेचे  अधिकारी मात्र दुर्लक्षच करीत आहेत. या अमरधाममध्ये गंगापूर गावासह शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी, ध्रुवनगर, हनुमाननगर, बेंडकुळे मळा या भागातीलरहिवासी त्यांच्या आप्तांवर मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी येतात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक