शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

शोकाकुल वातावरणात अहेर यांच्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: January 19, 2016 23:35 IST

शोकाकुल वातावरणात अहेर यांच्यावर अंत्यसंस्कार

देवळा : तालुक्याचे भूमिपुत्र व स्वतंत्र देवळा तालुक्याचे निर्माते माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव सोनूजी अहेर यांच्यावर सायंकाळी त्यांच्याच नावाने वसलेल्या दौलतनगर येथील मैदानावर शोकाकुल वातावरणात व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून ‘अमर रहे, अमर रहे डॉक्टर बाबा अमर रहे’ अशा घोषणा देत हजारोंच्या साश्रूनयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.सायंकाळी पाच वाजता शववाहिकेद्वारे देवळा येथे डॉ. अहेर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ निवासस्थानी आणण्यात आले, त्यावेळी जमलेल्या नातेवाईक, हितचिंतकांचा संयमाचा बांध सुटला. प्रत्येकाने आपल्या भावनांना वाट करून दिली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात येऊन दौलतनगरमधील डॉ. अहेर यांच्या ‘गिरिजा’ बंगल्यासमोरील मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस यंत्रणेकडून गोळीबाराच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी दुपारी तीन वाजेपासूनच मालेगाव-देवळा रोडवर रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. डॉ. अहेर यांच्या निधनाचे वृत्त सकाळी देवळ्यात कळताच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण व्यवहार बंद ठेवले. संपूर्ण गावात दिवसभर शुकशुकाट होता. अंत्यसंस्कारप्रसंगी आमदार स्नेहलता काळे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार अनिल कदम, आमदार सीमा हिरे, आमदार सुधीर तांबे, आमदार पंकज भुजबळ, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, प्रताप वाघ, माजी आमदार शिरीष कोतवाल, शांताराम अहेर, डॉ. शोभा बच्छाव, संजय चव्हाण, श्रीमती नीलिमा पवार, लक्ष्मण सावजी, विजय साने, सतीश कुलकर्णी, डॉ. हेमलता पाटील, श्रीराम शेटे, डॉ. शशीकांत पवार, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, बाळू पाटील, कारभारी अहेर, आत्माराम कुंभार्डे, डी. जी. सूर्यवंशी, नाना महाले, दत्ता पाटील, प्रकाश वडजे, नितीन पवार, रामचंद्र बापू पाटील, अरुण अहेर, बाळकृष्ण मगर, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.