शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

ओखी वादळग्रस्तांसाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:53 IST

डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांना शासनाने मंजूर केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकण व नाशिक विभागातील ओखी वादळग्रस्तांना मदतीसाठी निधी मंजूर केला होता. त्याचे आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. डिसेंबर महिन्याच्या ४ ते ६ तारखेच्या दरम्यान, अरबी समुद्रात ओखी वादळ सरकल्याने त्याचे परिणाम महाराष्टÑाच्या वातावरणावर झाला होता. ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर नाशिक जिल्ह्णात काही ठिकाणी गारपीटही झाली होती. द्राक्षबागांचा ऐन हंगामातच पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे नाशिक जिल्ह्णातील सुमारे दीड हजाराहून अधिक शेतकºयांच्या १२०० हेक्टरवरील द्राक्षाचे नुकसान झाले होते.  यासंदर्भात शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्णात पंचनामे पूर्ण करून शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात आला होता व शासनाने ठरविल्याप्रमाणे प्रती हेक्टरी १३,५०० रुपये भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्णासाठी २,३३,०८,२९० रुपयांची गरजही शासनाला कळविण्यात आली होती. त्यानुसार नुकसान झालेल्या आठ तालुक्यांसाठी शासनाचे निधी पाठविला आहे. सदरचे पैसे तत्काळ शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.तालुकानिहाय शेतकरी व रक्कममालेगाव (२६०)- ४५७०७४०सटाणा (८५५)- १४६५१८२०कळवण (३१)- ४६९९८०देवळा (४७)- ७२८१००दिंडोरी (२)- ९९००नाशिक (१३)- १२३९३०निफाड (४०)- ३७०२६०चांदवड (२५८)- २३८३५६० 

टॅग्स :Farmerशेतकरी