दिंडोरी : शहरातील विविध प्रलंबित विकासकामांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली दिंडोरी येथील शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी शिंदे बोलत होते.धामण नदी संवर्धन प्रकल्प, दिंडोरी शहरातील क्रीडा संकुल, नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत बांधकाम, शहर परिसरातील शिवार रस्ते, धामण नदीवरील मारुती मंदिराजवळील पूल, नगरपंचायतीचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी समावेशन व त्यांना किमान वेतन श्रेणी लागू करणे, गांधीनगर, जाधव वस्ती विकास प्रकल्प ही कामे नगरविकास खात्यातर्फे करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.यासह दिंडोरी शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी युवासेना विस्तारक नीलेश गवळी, नगरसेवक सचिन देशमुख, युवानेते रणजित देशमुख, नितीन गांगुर्डे आदी उपस्थित होते.
दिंडोरीतील प्रलंबित विकासकामांना निधी देणार : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:35 IST
दिंडोरी : शहरातील विविध प्रलंबित विकासकामांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले.
दिंडोरीतील प्रलंबित विकासकामांना निधी देणार : शिंदे
ठळक मुद्देशहरातील प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा केली.