शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
3
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
4
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
5
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
6
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
7
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
8
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
9
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
10
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
11
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
12
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
13
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
14
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
16
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
17
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
18
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
19
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
20
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
Daily Top 2Weekly Top 5

वस्ती विकासासाठी निधी

By admin | Updated: March 23, 2016 23:25 IST

येवला : २ कोटी ३५ लक्ष रु पये मंजूर

 येवला : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून येवला मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्याच्या योजनेखाली ६९ कामांना जिल्हा परिषदेने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ६९ कामांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध वसाहतीचा विकास करण्यासाठी रस्ता कॉँक्रीटीकरण, गटार बांधकाम, सौरदीप बसविणे, समाजमंदिर, सामाजिक सभागृह, नळ पाणीपुरवठा योजना, पाण्याची टाकी व पाइपलाइन या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी २ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तालुक्यातील पिंपळगाव लेप, पाटोदा, गुजरखेडे, खामगाव, महालखेडा, निमगाव, मढ, जळगाव नेऊर, देशमाने खु., एरंडगाव खु. डोंगरगाव, खरवंडी, निळखेडे, राजापूर, अंगुलगाव, सायगाव, बोकटे, पिंपळगाव जलाल, बाभूळगाव खु., नागडे, अंदरसूल, नांदूर, चांदगाव, नायगव्हाण, खिर्डीसाठे, नगरसूल, शिरसगाव लौकी, मुखेड, कोळम बु., कोटमगाव खु., पाटोदा, कोटमगाव बुद्रुक, कुसूर, बल्हेगाव, अंगणगाव शिवाय येवला मतदारसंघात जोडलेली निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव वनस, नांदूरमधमेश्वर, रुई, शिरवाडे वाकद, धारणगाव वीर, धानोरे, देवगाव, सारोळेथडी, खडकमाळेगाव, लासलगाव, टाकळी विंचूर, वनसगाव, ब्राह्मणगाव (विंचूर), निमगाव वाकडा, गोंदेगाव, कानळद, पाचोरे खुर्द, टाकळी विंचूर, पाचोरे बुद्रुक या गावात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेखाली कामे मंजूर झाली असल्याची माहिती आमदार छगन भुजबळ यांच्या संपर्ककार्यालयातून देण्यात आली आहे. ( वार्ताहर )