जुने नाशिकमधील लोणच्या उर्फ सुनील बेनेवाल याच्या टोळीने द्वारका येथे ८ फेब्रुवारी २०२१ रोजी आकाश रंजवे याचा धारधार शस्त्र भोसकून खून केला होता. यानंतर द्वारका, महालक्ष्मी चाळ परिसरात दंगल उसळली होती. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये संपूर्ण टोळीला बेड्या ठोकल्या. म्होरक्या बेनेवालसह २१ संशयितांविरुद्ध खुनाचा व दंगलीचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या बेनेवाल टोळीविरुद्ध पाण्डेय यांनी मोक्कानुसार कारवाई केली. या टोळीतील अटक संशयितांना शुक्रवारी तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील फरार पवार यास साहाय्यक पोलीस आयुक्त यांनी शनिवारी न्यायालयापुढे हजर केले. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील डॉ. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने पवारला ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
‘मोक्का’मधील फरार संशयिताला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST