शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फरार सागर देशमुखला शिर्डीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 01:02 IST

नाशिक : शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील राजीवनगर परिसरात सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केल्याप्रकरणी टोळीचा म्होरक्या संशयित सागर देशमुख यास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने बेड्या ठोकल्या. तसेच त्याचा दुसरा साथीदार ईश्वर जगदाळे हादेखील पोलिसांच्या हाती लागला आहे.

ठळक मुद्देकार्यालय तोडफोड प्रकरण : साथीदार ईश्वरही ताब्यात

नाशिक : शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील राजीवनगर परिसरात सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केल्याप्रकरणी टोळीचा म्होरक्या संशयित सागर देशमुख यास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने बेड्या ठोकल्या. तसेच त्याचा दुसरा साथीदार ईश्वर जगदाळे हादेखील पोलिसांच्या हाती लागला आहे.राजीवनगर येथील संपर्क कार्यालयवर बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास आठ ते दहा मोटारसायकलवरून आरोपी सागर देशमुख व त्याचे १० ते १५ साथीदारांनी येत दगडफेक करून सोनवणे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. तसेच कार्यालयाबाहेर उभी असलेली महापालिकेची, शासकीय वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती.

तोडफोड करून जाताना टोळक्यांनी ह्यतुम्हाला सगळ्यांना बघून घेऊह्ण असा दमही दिला होता. इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर देशमुखसह त्याच्या साथीदारांवर दरोडा, शासकीय वाहनांचे नुकसान, दंगलसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट 1 चे पथकही याप्रकरणी समांतर तपास करत आहेत.

दरम्यान, पथकातील पोलीस नाईक प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फरार सागर देशमुख व त्याचा साथीदार ईश्वर जगदाळे यास शिताफीने शिर्डीतून गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण पाच संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी