शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सहवासनगरच्या झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:32 IST

महापालिकेच्या वतीने सहवासनगर येथील झोपडपट्टीवासीयांना त्याचठिकाणी घरे द्यावी यासाठी सहवासनगर बचाव समितीच्या वतीने बुधवारी (दि.२३) राजीव गांधी भवनावर मोर्चा काढण्यात आला. याचवेळी खासगी भूखंडावरील झोपडपट्ट्या हटविण्यासाठी स्वारस्य दाखवणाऱ्या महापालिकेच्या अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आणि ती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्य केली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने सहवासनगर येथील झोपडपट्टीवासीयांना त्याचठिकाणी घरे द्यावी यासाठी सहवासनगर बचाव समितीच्या वतीने बुधवारी (दि.२३) राजीव गांधी भवनावर मोर्चा काढण्यात आला. याचवेळी खासगी भूखंडावरील झोपडपट्ट्या हटविण्यासाठी स्वारस्य दाखवणाऱ्या महापालिकेच्या अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आणि ती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्य केली आहे.नाशिक शहरातील कालिका देवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस सहवासनगर ही झोपडपट्टी असून एकूण दीडशे कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. सदरची झोपडपट्टी खासगी भूखंडावर असली तरी गेल्या चाळीस वर्षांपासून ही झोपडपट्टी असल्याने १९९३ साली ती अधिकृत घोषित करून शासनाच्या राजपत्रात प्रसिद्धदेखील करण्यात आली. दरम्यान, जागा मालकाने न्यायालयात दाद मागितल्यानंतर ही झोपडपट्टी हटविण्याचे आदेश २०१७ मध्ये देण्यात आले होते. परंतु ते दडवून ठेवून ऐनवेळी म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची मुदत संपताना गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.यावेळी आदेश दडवणाºयांची चौकशी करतानाच सहवासनगरमधील झोपडपट्टीवासीयांना सध्याच्या ठिकाणीच घरकुल योजना उपलब्ध करून द्यावी, याच भूखंडावर शासनाची वाल्मीकी आंबेडकर आवास योजना राबविण्यात आली होती ती अधर्वट असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चात बचाव समितीच्या वतीने संतोष गायकवाड, अनिल पवार, सुनील जाधव, गणेश बेंडकुळे, रत्ना जाधव, पुष्पा बाविस्कर, मीना राऊत, मंदा पवार यांच्यासह अन्य रहिवासी सहभागी झाले होते.नगरसेवकाचा आरोपवर्षभर न्यायालयाचे आदेश बजावून ते संपण्याच्या वेळी नोटिसा बजावण्यामागे स्थानिक झोपडपट्टीवासीयांना न्यायालयात जाण्याची संधी मिळू नये हाच उद्देश असल्याचा आरोप प्रभागाच्या महिला नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला असून त्याच्या चौकशीसाठी मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक