शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

वीज वितरण कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 00:05 IST

पिंपळगाव बसवंत : खंडित वीजपुरवठा

पिंपळगाव बसवंत : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.५ एप्रिलपासून पालखेड डाव्या कालव्याला मनमाड, येवल्यासाठी पिण्याचे पाणी सोडल्याने कालव्यालगतचा वीजपुरवठा २८ तासांसाठी खंडित करण्यात आला होता. मात्र दोन तासांचा वीजपुरवठा सुरू होता. परंतु आता हा दोन तासांचा वीजपुरवठाही बंद झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कालव्यापासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या गावाचाही वीजपुरवठा २२ तासांसाठी बंद करण्यात आला होता. सिंगल फेज योजनाही बंद पडल्याने रात्र अंधारात काढावी लागत होती. वीज उपलब्ध नसल्याने पिण्याच्या पाण्याचेही नियोजन विस्कटले होते. आठ दिवसांपासून बहुतांश गावांना पाणीपुरवठा होत नव्हता. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश आल्याचे सांगत वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी कुठलाही आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले. तानाजी बनकर, भास्कर बनकर, सुरेश खोडे यांनी मोर्चा काढत महावितरणच्या दारात ठिय्या मांडला. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. त्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले.उंबरखेड येथील शेतकऱ्यांनी यापुढील वीजबिल न भरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. सिंगल फेज योजना बंद आहे. वीज नसल्याने गाव अंधारात असते, असे गांवकऱ्याचे म्हणणे आहे.यावेळी संजय मोरे, काका मेंगाणे, साहेबराव देशमाने, बाळासाहेब बनकर, दिलीप देशमाने, लक्ष्मण खोडे, संदीप बनकर, भारत खोडे, देवा काजळे, संपत विधाते, रामकृष्ण कंक, राजेद्र निरघुडे, प्रभाकर बनकर, नंदू देशमाने, तुकाराम गवळी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)