शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील सहवास नगर येथील झोपडपट्टीवासियांचा महापालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 15:43 IST

वर्षभर न्यायालयाने  आदेश बजावून ते संपण्याच्या वेळी नोटिसा बजावण्यामागे स्थानिक झोपडपट्टीवासियांना न्यायालयात जाण्याची संधी मिळू नये हाच उद्देश असल्याचा आरोप प्रभागाच्या महिला नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला

ठळक मुद्देझोपडपट्टी हटविण्याचे न्यायालयाचे आदेश वर्षभरापासून दडवलेअधिकृत झोपडपट्टी असल्याने तेथेच घरकुल योजना राबविण्याची मागणी

नाशिक महापालिकेच्या वतीने सहवास नगर येथील झोपडपट्टीवासियांना त्याच ठिकाणी घरे द्यावी यासाठी सहवास नगर बचाव समितीच्या वतीने बुधवारी (दि. २३) राजीव गांधी भवनावर मोर्चा काढण्यात आला. याचवेळी खासगी भूंखडावरील झोपडपट्ट्या हटविण्यासाठी स्वारस्य दाखवणाऱ्या महापालिकेच्या अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी नागरीकांनी केली आणि ती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्य केली आहे.

नाशिक शहरातील कालिका देवी मंदिराच्या पाठीमागील बाजुस सहवास नगर ही झोपडपट्टी असून एकुण दीडशे कुटूंब येथे वास्तव्यास आहेत. सदरची झोपडपट्टी खासगी भूखंडावर असली तरी गेल्या चाळीस वर्षांपासून ही झोपडपट्टी असल्याने १९९३ साली ती अधिकृत घोषीत करून शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द देखील करण्यात आाली. दरम्यान, जागा मालकाने न्यायालयात दाद मागितल्यानंतर ही झोपडपट्टी हटविण्याचे आदेश २०१७ मध्ये देण्यात आले होते. परंतु ते दडवून ठेवून ऐनवेळी म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची मुदत संपताना गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. वर्षभर न्यायालयाने  आदेश बजावून ते संपण्याच्या वेळी नोटिसा बजावण्यामागे स्थानिक झोपडपट्टीवासियांना न्यायालयात जाण्याची संधी मिळू नये हाच उद्देश असल्याचा आरोप प्रभागाच्या महिला नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला असून त्याच्या चौकशीसाठी मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आदेश दडवणा-यांची चौकशी करतानाच सहवास नगरमधील झोपडपट्टीवासियांना सध्याच्या ठिकाणीच घरकुल योजना उपलब्ध करून द्यावी, याच भूखंडावर शासनाची वाल्मिकी आंबेडकर आवास योजना राबविण्यात आली होती ती अधर्वट असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चात बचाव समितीच्या वतीने संतोष गायकवाड, अनिल पवार, सुनील जाधव, गणेश बेंडकुळे, रत्ना जाधव, पुष्पा बावीस्कर, मीना राऊत, मंदा पवार यांच्यासह अन्य रहीवासी सहभागी झाले होते. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका