शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

मैत्रीचा ‘घात’ : ७०० रूपयांच्या उसनवारीसाठी मित्रानेच काढला मित्राचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:58 IST

'' १८ हजार रुपये असतानाही ७०० रुपये का देत नाही''  यावरुन वाद

ठळक मुद्देअशोक यांनी संदीपकडून ७०० रुपये उसने घेतले होतेपोलिसांनी संदीप यास अटक केली आहे

नाशिक : मोहदरी घाटात १९ जुलैला एका युवकाचा मृतदेह आढळला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. उसने दिलेले ७०० रुपये परत करण्यास नकार दिल्याने मित्रानेच मित्राचा खुन केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी संदीप मनोहर सोनवणे (२६, रा. अशोकनगर, सातपूर) यास अटक केली आहे.मोहदरी घाट परिसरातील वन उद्यानाजवळ १९ जुलैला एक मृतदेह आढळून आला होता. डोक्यास मार असल्याने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो मृतदेह अशोक बारकु महाजन (३८, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरुवात केली. त्यानुसार अशोक महाजन हे औद्योगिक वसाहतीत प्रॉक्सी पेंटीगची कामे करत असल्याचे समजले.  त्यांच्यासोबत संदीप सोनवणे हा देखील असल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीत त्याने अशोक यांचा खून केल्याची कबुली दिली.अशोक आणि संदीप यांच्यात एक ते दीड वर्षांपासून मैत्री होती. काही दिवसांपूर्वीच अशोक यांनी संदीपकडून ७०० रुपये उसने घेतले होते. औद्योगिक वसाहतीतून एकाकडून १८ हजार रुपये घेऊन दोघेही दुचाकीवरुन नाशिकला येण्यासाठी निघाले. मोहदरी घाटात संदीपने अशोककडे उसने दिलेले ७०० रुपये मागितले. मात्र अशोक यांनी पैसे नंतर देतो, असे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला.'' १८ हजार रुपये असतानाही ७०० रुपये का देत नाही''  यावरुन वाद सुरु असताना  संदीपने एक दगड उचलून अशोकच्या डोक्यात टाकला. त्यातच अशोकचा मृत्यू झाला. त्यानंतर संदीपने अशोककडील १८ हजार रुपयांची रोकड घेऊन नाशिक गाठले. पोलिसांनी संदीप यास अटक केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक निरीक्षक अनिल वाघ, सहायक उपनिरीक्षक प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके, नाइक प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, शिपाई निलेश कातकाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

टॅग्स :MurderखूनArrestअटकCrime Newsगुन्हेगारी