शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना बांधले मैत्रीचे बंध

By admin | Updated: August 2, 2016 02:20 IST

जागतिक विश्वमैत्री दिन : सातपूर प्रभागात विविध उपक्रम

 सातपूर : जागतिक विश्वमैत्री दिवसाचे औचित्य साधत स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने सातपूर विभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शासनाच्या निर्देशानुसार दर पंधरा दिवसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांमुळे देशाचे व शहरामधील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहत असल्यामुळे पहिला दिवस स्वच्छता मित्र म्हणून साजरा करण्यात आला. महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना फ्रेंडशिप पट्टी बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदरचा उपक्रम सातपूर विभागात काही प्रभागांत राबविण्यात आला. सातपूर प्रभाग क्र . २० मध्ये नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी सातपूर येथील मायको दवाखान्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रभाग सभापती कार्यालयात सभापती सविता काळे यांनी कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक विलास शिंदे यांच्या वतीने गंगापूरगाव क्रांती चौक येथे स्वच्छता मैत्री दिवसाचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, उपअभियंता संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवि काळे, संतोष गायकवाड, पी. के. जाधव, माधुरी तांबे, गोविंद कोष्टी, केतन मारू, ओम खैरनार, अशोक उशिरे, वसंत पंडित, शैलेश बागुल, राजेंद्र नेटावटे, आकाश पगारे, संतोष काळे, चिंतामण पवार आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)