शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:30 IST

विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने देवळालीवासीयांना ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : देवळाली कॅम्प भागात दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब

देवळाली कॅम्प : विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने देवळालीवासीयांना ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत.देवळाली कॅम्प परिसरात कुठेही रिमझिम पावसाला सुरुवात झाली किंवा पाऊस पडणार असे वातावरण झाले तरी देवळाली कॅम्प परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला होता. लॅमरोड परिसरात वारंवार वीज गायब होत असल्यानेनागरिक वैतागले आहेत. लॉकडाऊन काळात व सद्यस्थितीत नागरि भागात कुठेही विद्युत पुरवठा खंडित करू नये, असा आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश आहेत. तरीही देवळाली कॅम्प मात्र किती काळ विद्युत पुरवठा सुरळीत राहतो, याची नोंद विद्युत मंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा भूमिगत करण्याची मागणी होत आहे. कारण कुठे झाड पडले की, केबल तुटून शॉर्टसर्किट होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे, असेच प्रकार सर्रासपणे घडत असतात. यातून एखाद्या ठिकाणी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवळाली कॅम्प परिसरात विद्युत पुरवठा कायम सुरळीत राहावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.दरम्यान, वारंवारपणे विद्युत पुरवठा खंडित होत राहिला तर अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांना याबाबत घेराव घालत जाब विचार असल्याचे माजी आमदार योगेश घोलप, साहेबराव चौधरी, पोपट जाधव, तानाजी भोर, संजय गोडसे, वैभव पाळदे, रोहित कासार, प्रमोद मोजाड, प्रवीण पाळदे आदी सांगितले.जेलरोड भागात तीन तास वीज नाहीनाशिकरोड,जेलरोड शिवाजीनगर येथील समाजमंदिराजवळील विजेच्या फिडरवर झाडाची मोठी फांदी पडल्याने जेलरोड भागातील वीजपुरवठातीन तास खंडित झाला. यात फिडरचे मोठे नुकसान झाले आहे.जेलरोड शिवाजीनगर समाजमंदिराजवळील महावितरणच्या फिडरवर दुपारी झाडाची मोठी फांदी पडल्याने जेलरोड भागातील वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला होता. दुपारी ३ वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल तीन तासांनंतर सुरळीत सुरू झाला. मात्र यामुळे व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला.गेल्या तीन दिवसांपासून वीज प्रवाह सातत्याने खंडित होत आहे. त्यातच पुन्हा आज तीन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने रहिवासी व व्यावसायिक त्रस्त झाले होते. झाडाची फांदी पडल्याने फिडरचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महापालिका आणि महावितरणच्या कर्मचाºयांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत फांदी हटविल्यानंतर वीज प्रवाह सुरळीत सुरू झाला.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज