शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

औद्योगिक वसाहतीत वारंवार बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:18 AM

पिंपळगाव बसवंत : श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीत वारंवार दर तासाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वसाहतीतील उत्पादन ठप्प झाले असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वारंवार खंडित वीजपुरवठ्याचा उद्योगांवर परिणाम

पिंपळगाव बसवंत : श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीत वारंवार दर तासाला विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वसाहतीतील उत्पादन ठप्प झाले असून, उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील श्री समर्थ औद्योगिक वसाहतीत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेक उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र फीडर टाकणार असल्याचे वर्षांपासून आश्वासन देत आहे, मात्र अजूनही त्याची पूर्ती नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतील उद्योजक एकत्रपणे महावितरण विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भास्करराव बनकर व व्यवस्थापक अरुण काळे यांनी दिली. पिंपळगावच्या औद्योगिक क्षेत्रात स्टील रोलिंग मिल, प्लॅस्टिक मोल्डिंग उद्योग, फूड इंडस्ट्री, फार्मसिटिकल आदी सातत्याने प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात असून व या उद्योगांना सुरळीत वीजपुरवठा लागतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.महावितरणने मागील काही दिवसांपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याचा दावा केला, मात्र सध्या वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. तसेच, ट्रान्सफॉर्मर बसवणे किंवा तांत्रिक कारण अथवा नैसर्गिकरीत्या होणाऱ्या ४८ तासांच्या शटडाऊनलाही औद्योगिक वसाहतीतील उद्योजक नेहमी सहकार्य करतात.मात्र नुकसान टाळण्यासाठी नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली जाते, तेव्हा महावितरण कंपनी सहकार्य करत नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतील उद्योजकांना त्याचा फटका बसत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी पिंपळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक महावितरण कंपनीवर धडक मोर्चा नेणार असल्याचे समर्थ औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भास्करराव बनकर व व्यवस्थापक अरुण काळे यांनी सांगितले.औद्योगिक वसाहतीला स्वतःचा फीडर हवा आहे. कारण पिंपळगाव सबस्टेशनमधील फीडर पिंपळगावपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सतत ओव्हर लोडिंग होऊन फीडर ट्रिप होतो. यासाठी महावितरणने पिंपळगाव औद्योगिक वसाहतीला स्वतंत्र फीडर देऊन औद्योगिक ग्राहकांची मुख्य अडचण दूर करावी.- सुधाकर कापडी, संचालक, पिंपळगाव बसवंत, एमआयडीसीपिंपळगाव औद्योगिक वसाहतीमधून महावितरण कंपनीला कोट्यवधींची वसुली होत असते. तरीही महावितरण कंपनी सुरळीतपणे वीजपुरवठा देत नाही. प्रत्येकी दोन तासाला वीजपुरवठा खंडित करते, त्यामुळे उद्योजकांचे लाखो रुपयांचे दररोज नुकसान होत आहे. कंपनीने वेळेत वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उद्योजक रस्त्यावर उतरतील.- अरुण काळे, व्यवस्थापक, औद्योगिक वसाहत, पिंपळगाव बसवंतवेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीने समर्थ औद्योगिक वसाहतीत सुरळीतपणे वीजपुरवठा केला नाही तर नाइलाजाने आम्हाला युनिट बंद करावे लागेल. परिणामी वसाहतीतील प्रगती खंडित होईल त्यामुळे योग्य दखल घ्यावी.- रमेश बोरस्ते, संचालक, बोरस्ते ॲग्रो.

टॅग्स :talukaतालुकाelectricityवीज