शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांकडून उर्वरित शुल्क भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 19:03 IST

नाशिक : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेली दोन तीन महिने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद ...

ठळक मुद्देपालकांमध्ये नाराजी सक्तीची पुस्तके खरेदीच्या नावाखाली सर्रासपणे लूट

नाशिक : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेली दोन तीन महिने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले होते. त्यातच मोठ्या प्रमाणावर कारखान्यातील कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत असताना आता पालकांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहरातील अनेक खासगी शाळांकडून उर्वरित तसेच आगामी शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यासाठी वारंवार पालकांकडे तगादा लावला जात आहे.त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त ठराविक पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तकांचा संच खरेदी करावा, असेदेखील सांगण्यात येत आहे. तसेच इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता दोन हजार ते सहा हजारांपर्यंत या पुस्तक संचाची किंमत असल्याने पालकांची अक्षर लूट सुरू आहे. शासन स्तरावरून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा, महाविद्यालय सुरू केल्यास काय खबरदारी घेतली पाहिजे, याबाबत उपाययोजना केल्या जात आहे, तर दुसरीकडे मात्र खासगी शाळांकडून पालकांवर आर्थिक बोजा टाकला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांना व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पुस्तक संच व त्याच्या किमतीचे रेट कार्ड पाठविले असून, ठराविक विक्रेत्यांकडून सदर पुस्तक संच खरेदी करावा, असे सांगण्यात येत आहे. सदर पुस्तक संचाची किंमत जास्त असल्याने त्याचप्रमाणे गणवेश व इतर शैक्षणिक साहित्याच्या किमती २० ते ३० टक्के वाढल्याने पालकांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आधीच अनेक पालकांकडे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पगार नसल्याने त्यांच्या पुढे आर्थिक अडचण निर्माण झाल्याने पाल्याचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा