शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

सात वर्षांच्या गुलामगिरीतून मजुरांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:23 IST

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच ...

ठळक मुद्देवणी पोलिसात गुन्हा दाखल; श्रमजीवीने मुक्त केले द्राक्षबागेतील वेठबिगार

वैतरणानगर : श्रमजीवीच्या वेठबिगारमुक्ती मोहिमेमुळे मागील आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील दांपत्याची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून सुटका केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ठाणगाव (सुरगाणा) येथील मजुरांची वणी (दिंडोरी) येथील द्राक्ष बागायतदार मालकाच्या सात वर्षाच्या गुलामगिरीतुन सुटका केली आहे.जऊळके येथील बागायतदार मालक राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे अत्यल्प मजुरीत वेठबिगार असलेल्या तुकाराम गावित या मजुराची पत्नी मुलांसह सुटका करत मालकावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी दिली. तुकाराम पांडू गावित (३३) यांच्या गावातील यशवंत नामदेव ठाकरे हा जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्याकडे द्राक्षबागेत कामाला होता. यशवंतच्या ओळखीने तुकारामला पाटील यांनी ५० हजार रुपये आगाऊ दिले. घराचे काम आटोपून तुकाराम दोन महिन्यानंतर जऊळके येथे राजेंद्र बाबूराव पाटील यांच्या द्राक्षबागेत कामासाठी आपले बिºहाड घेऊन दि. ६ जून २०१३ रोजी गेला. त्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम आणि त्याची पत्नी दोघेही बागेत काम करू लागले. सुरुवातीला कामाचा मोबदला म्हणून २५ हजार रुपये व तीन पोते बाजरी वर्षाला देता येईल, असे सांगितले. गेले म्हणजे केवळ ६८ रुपये दिवस मजुरी आणि तुकारामाच्या पत्नीला ७० रुपये मजुरी मालक देत होता. त्या बदल्यात हे दोघे रोज सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत बागेचे काम करत होते. त्यानंतरसात वर्षात ही मजुरी वार्षिक४५ हजारपर्यंत पोहचली.महिन्याला अवघी १२३ रुपये मजुरी, बदल्यात अधिक काम करून घेतले गेले. याला कंटाळून त्यांनी श्रमजीवी संघटनेकडे धाव घेऊन न्याय मिळविला.मालकाचा जाचवणी येथील मालकाकडे जेव्हा तुकाराम हिशेब सांगत असे तेव्हा मालक तुकारामाच्या अंगावरच २० ते २५ हजार उलट शिल्लक असल्याचे सांगत होता. या जाचाला कंटाळून तुकारामने परवडत नसल्याचे सांगितले तेव्हा मालकाने तुकारामच्या अंगावरच १ लाख ५३ हजार ३०० रु पये बाकी असल्याचे सांगत ती फेड आणि मगच जा, असे सांगत त्याच्या पत्नीला बंधक बनवून राबवत ठेवले.कार्यकर्त्यांचे प्रसंगावधानश्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे या कुटुंबाची सुटका झाली. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या वेठबिगार मुक्तीच्या प्रकरणात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, मुरलीधर कनोज, राजू राऊत, हिरामण कडाळी यांनी सततचा पाठपुरावा करत कुटुंबाच्या माथी मारलेला गुलामगिरीचा डाग यशस्वीपणे पुसून काढला आहे.

असहायतेचा गैरफायदागरिबांच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा घेत त्यांचे श्रम विकत घेऊन त्याच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रकार सध्या ठिकठिकाणी श्रमजीवी संघटना उघड करत आहे. याच गावातील मजुरांना श्रमनजीवीने मुक्त केलेले असल्याने कार्यकर्त्यांकडे न्यायाच्या अपेक्षेने तुकारामने संपर्क केला. कार्यकर्त्यांच्या तत्परतेने आणि विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनामुळे पोलिसांनीदेखील तातडीने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस