शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

साडेतीनशे बसेसमध्ये मोफत वायफाय सेवा

By admin | Updated: March 16, 2017 16:18 IST

एसटी बसचा कंटाळवाणा प्रवास आता सुखकर ठरू लागला आहे.

ऑनलाइन लोकमत/ भाग्यश्री मुळे

नाशिक, दि. 16 - आवडती गाणी, अथवा आवडता चित्रपट किंवा कामाच्या व्यवधानांमुळे हुकलेल्या एखाद्या मालिकेचा भाग... असे सर्व आता बसमध्ये सफर करतानाच प्रवासी बघत आहेत त्यातून एसटी बसचा कंटाळवाणा प्रवास आता सुखकर ठरू लागला आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी  साडे तीनशे बसमध्ये मोफत वायफाय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एसटी भरभराटीला लागण्याची चिन्हे आहेत.
 
सामान्यत: एसटीचा प्रवास हा धक्के खात उभे राहण्यातच असतो. बसमध्ये प्रवास करणे हा कंटाळवाणे ठरते. ग्रामीण भागात नागरीकांना बसशिवाय पर्यायच नसतो. परंतु आता परिवहन महामंडळाने ही स्थिती बदलली आहे. वायफायच्या माध्यमातून मिळणा-या सेवेमुळे प्रवासी आकर्षित होत आहेत. वायफाय बॉक्स बसवलेल्या बसमध्ये प्रत्येक प्रवाशाच्या आसनावर ते वापरण्याविषयीच्या सूचना सविस्तरपणे दिल्या आहेत.  
 
त्यानुसार एकदा प्रवाशाचा स्मार्टफोन त्यावर लॉगीन झाल्यानंतर त्याला कायमस्वरुपी वायफायचा आनंद घेता येत आहे. या सुविधेमुळे प्रवासात मनोरंजनाचा लाभ घेता येत असल्याने अबालवृद्ध प्रवासी, वाहक यांनीही सुखावले आहेत. या सुविधेअंतर्गत प्रवाशांना लोकप्रिय हिंदी मराठी चित्रपट, लोकप्रिय हिंदी-मराठी मालिका, मराठी नाटक, जुनी नवीन गाणी पाहता येत आहे. 
 
शहर बस, लांब पल्लयाच्या बस, साध्या, वातानुकुलित अशा सर्व बसमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून आवडीचा कार्यक्रम सुरु केल्यास बस रेंजमधुन बाहेर गेल्यानंतरही त्याचा विनाअडथळा लाभ घेता येत आहे. नाशिक-१ या आगाराच्या सर्व बस, मालेगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर आगाराच्या बस अशा जवळपास ३५० बस वायफायने सुसज्ज झाल्या असून उर्वरित बसमध्ये लवकरच वायफाय यंत्रणा बसवण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.