त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ठाणापाडा व लगतच्या शासकीय आश्रमशाळेच्या ५४७ विद्यार्थ्यांची मुंबई येथील इंडिया बुल्स फाउंडेशन मार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.प्रारंभी आश्रमशाळेच्या आवारात दीपप्रज्वलनाने आरोग्य शिबीराची सुरु वात करण्यात आली. इंडिया बुल्स फाउंडेशनचे व्यवस्थापक शंकर कोकणे यांनी आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, शाळेच्या आवाराची स्वच्छता, परिसर स्वच्छता, नैसर्गिक स्वच्छतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होणारी समाजसेवा विषद करत केली.यावेळी व्यासपीठावर सरपंच महेंद्र पवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हरिदास अवतार, डॉ. कल्याण जाधव, डॉ. राहुल कुशारे, डॉ. अमोल भडांगले, मुख्याध्यापक ए. एस. चौरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी शाळेच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तर इंडिया बुल्स फाउंडेशनचे रमेश अनमूलवार, सुनील घोडके, दिर्घायु रोकडे, केतन धनगरे, जावेद फकीर, समाधान हिरे आदींसह वसतिगृह अधिक्षक अरुण बागले, पूनम बावणे, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे ठाणापाडा या आदिवासी व दुर्गम भागात मुंबई येथील इंडिया बुल्स फाउंडेशन सारख्या संस्थेने सामाजिक जाणिवेतून आरोग्य शिबीर घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
ठाणापाडा येथे ५७४ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 18:01 IST
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ठाणापाडा व लगतच्या शासकीय आश्रमशाळेच्या ५४७ विद्यार्थ्यांची मुंबई येथील इंडिया बुल्स फाउंडेशन मार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.
ठाणापाडा येथे ५७४ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : इंडिया बुल्स फाऊंडेशनतर्फेआश्रम शाळेत उपक्रम